-
अलाया एफ तब्बल आठ वर्षांनंतर न्यू यॉर्कला परतली आहे. शहरात परत आल्यावर ती म्हणते, “पोट भरलंय, हृदय भरलंय. ही भावना केवळ तिची नाही, तर अनेकांची आहे; जी जागा मनाला जवळची असते, तिथे परतणं ही एक खास अनुभूती असते. अलायाचे फोटो आणि तिच्या कॅप्शन्स अनेकांच्या मनात आपुलकी जागवतात.
-
अलाया एफच्या फोटो डंपवरून तिच्या न्यू यॉर्क ट्रिपमधील खाद्यप्रवासाची झलक दिसून येते. या ट्रिपची सुरुवात तिने हेल्दी आणि स्वच्छ घटकांची किराणा खरेदीने केली– ज्यामध्ये केळी, चेरी टोमॅटो, बदाम, बाल्सॅमिक व्हिनेगर, काकडी व अव्होकॅडो यांचा समावेश होता.
-
कधी कधी, अलाया न्यू यॉर्कच्या प्रसिद्ध थिन क्रस्ट पिझ्झाचाही आस्वाद घेताना दिसली. आरोग्यदायी खाण्याबरोबरच स्थानिक चवींचा अनुभव घेण्यात तिने विशेष आनंद घेतला.
-
एका चविष्ट जेवणासाठी अलायानं लेट्यूस, केल, टोमॅटो व स्क्रॅम्बल्ड अंडी यांची एक पौष्टिक आणि स्वादिष्ट वाटी तयार केली होती. ही डिश पाहताच तिने आरोग्य आणि चव यांचा उत्तम समतोल साधला असल्याचं लक्षात येतं.
-
अर्थातच, थोड्या गोडाविना हा प्रवास पूर्ण होणं शक्यच नव्हतं. चॉकलेट फ्रॉस्टिंग आणि आयसिंग शुगरने सजलेले डोनट्स हे अलायाचं परफेक्ट ‘गिल्टी प्लेजर’ ठरलं.
Photos: अलाया एफ न्यू यॉर्क व्हेकेशन मोडमध्ये – पाहा खास फोटो
Alaya Enjoys a Stylish Vacation in New York : आठ वर्षांनंतर न्यू यॉर्कमध्ये परतली अलाया भावना, आठवणी आणि फुडी ट्रिपचा मिलाफ
Web Title: Alaya enjoys a stylish vacation in new york see the photos ama06