-
नुकत्याच बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली. २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर या तीन टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर १० नोव्हेंबर रोजी निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात येईल. निकाल काय असतील हे वेळच ठरवणार आहे. परंतु या निवडणुकीतील युवा चेहरे मात्र सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. पाहूया कोण आहेत हे नेते.
-
लालू प्रसाद यांदव यांच्या अनुपस्थितीत राष्ट्रीय जनता दल यावेळी तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवत आहे. तेजस्वी यादव यांच्यावर यावेळी निवडणुकांमध्ये मोठी जबाबदारी आहे.
-
लालू प्रसाद यादव यांचे मोठे सुपुत्र तेजपाल यादव हे दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पहिल्यांदा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर त्यांच्याकडे आरोग्य मंत्रीपदाची जबाबदारी होती. ते आपल्या वडिलांप्रमाणे अस्सल बिहारी शैलीसाठी परिचयाचे आहेत.
-
तेज प्रताप यादव आणि त्यांच्या पत्नी ऐश्वर्या राय यांचं घटस्फोटाचं कारण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. यादरम्यान ऐश्वर्या राय यांच्या निवडणूक लढवण्याच्या निर्णयाचीही चर्चा होत आहे. ते आपल्या पतीविरोधात निवडणूक लढवू शकतात असं म्हटलं जात आहे.
-
लोकजनशक्तीचे खासदार चिराग पासवान हेदेखील बिहार निवडणुकांचं केंद्र ठरत आहेत. जागा वाटपावरूनही त्यांनी एनडीला आपली कठोर भूमिका दाखवून दिली आहे. चिराग यांच्या खांद्यावर पक्षाला अधिकाधिक जागा विजय मिळवून देण्याची जबाबदारी आहे.
-
प्लूरल्स पार्टीच्या अध्यक्ष पुष्पम प्रिया चौधरी यादेखील सध्या चर्चेत आहेत. आपल्या पक्षाकडून त्यांनी स्वत:ला मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केलं आहे. त्यांनी लंडनमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. बिहारचा चेहरामोहरा आपल्याला बदलायचा असल्याचंही त्यांनी यादरम्यान सांगितलं.
Bihar Election : कोणी लंडन रिटर्न तर कोणी अस्सल बिहारी; चर्चेचे केंद्र ठरतायत ‘हे’ युवा चेहरे
Web Title: Bihar election date from rjd lalu prasad yadav son tejashwi to chirag paswan these 5 youths are in limelight social media photos jud