-

सोमवारी सायंकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी जुन्या दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकाबाहेरील गेट क्र. १ जवळ वाहनाचा स्फोट झाला. यामुळे अनेक वाहनांना आग लागली.
-
पोलीस अधिकाऱ्यांनी स्फोटाचे ठिकाण लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्र. १ च्या बाहेर असल्याचे सांगितले. दिल्ली गेट ते काश्मिरी गेटला जोडणाऱ्या रस्त्यावर हा स्फोट झाला. ही परिसर चांदणी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या विरुद्ध बाजूस आहे. तर जामा मशिदीपासून केवळ दीड किमी अतंरावर आहे.
-
जुन्या दिल्लीतील दाट लोकवस्ती असलेल्या भागात हा स्फोट घडला. एक संथ गतीने येणाऱ्या गाडीने रेड सिग्नल दिल्यावर ६ वाजून ५२ मिनिटांनी स्फोट घडला. गाडीत जवळपास दोन ते तीन लोक बसले होते, अशी माहिती दिल्ली पोलीस आयुक्तांनी दिली.
-
या स्फोटात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर अनेकजण जखमी असल्याचे सांगितले जाते.
-
लाल किल्ल्याजवळून संथ गतीने जाणाऱ्या वाहनात स्फोट झाला. वाहनात त्यावेळी वाहनात दोन ते तीन प्रवासी होते. या स्फोटामुळे आजूबाजूच्या वाहनांचेही नुकसान झाले, अशी माहिती दिल्ली पोलीस आयुक्त सतीश गोलचा यांनी दिली.
-
या घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलीस, एफएसएल, एनआयए, एनएसजी आणि इतर यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या, असेही पोलीस आयुक्त म्हणाले.
-
दिल्ली पोलिसांनी लाल किल्ला स्थानकावरील गेट क्रमांक १ आणि ४ वरील रहदारी बंद केली आहे. मात्र मेट्रो सेवा सुरू आहे.
-
घटनास्थळी आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या सात गाड्या दाखल झाल्या होत्या. त्यांनी आगीवर त्वरीत नियंत्रण मिळवले.
-
गृहमंत्री अमित शाह यांनी तात्काळ सर्व यंत्रणांशी संपर्क साधून घटनेचा आढावा घेतला. तसेच जखमींवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयालाही भेट दिली. स्फोटामुळे लाल किल्ल्याजवळ उभ्या असलेल्या वाहनांच्या चिंधड्या उडाल्याचे फोटोंमधून दिसून आले.
Delhi Red Fort Blast: वाहनांच्या चिंधड्या उडाल्या, लाल किल्ल्याजवळ स्फोटानंतर काय चित्र दिसलं? पाहा फोटो
Delhi Red Fort Car Blast: दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्थानकाजवळ स्फोट झाल्यानंतर दिल्लीसह महत्त्वाच्या शहरांमध्ये हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
Web Title: Vehicles on fire see pictures after delhi red fort metro station explosion 8 dead kvg