-

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज ८१ वा वाढदिवस आहे. महाराष्ट्राचे हे लाडके व्यक्तिमत्व राजकारणाच्या पटलावर ‘चाणक्य’ म्हणून ओळखले जाते.
-
शरद पवार यांचे क्रीडा क्षेत्रात मोठे योगदान आहे. कुस्ती, कबड्डी, हॉकी या सगळ्याच खेळांसाठी पवारांनी मोठे योगदान दिले आहे. क्रिकेटची आयपीएल स्पर्धा सुरु होण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
-
इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) माजी आयुक्त ललित मोदी यांनी पवारांबाबत एक खुलासा केला होता. ”२००५-२००८ या काळात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष शरद पवार नसते तर, आयपीएल ही टी-२० स्पर्धा साकार झाली नसती. साहेबांनी मला मोकळा हात दिला”, असे मोदी म्हणाले होते.
-
आयपीएल ही स्पर्धा पुढे एक प्रमुख क्रिकेट स्पर्धा बनली आणि तिची तुलना नॅशनल फुटबॉल लीग, मेजर लीग बेसबॉल, नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन आणि प्रीमियर लीग यांच्याशी केली गेली.
-
“आयपीएल सुरू करण्यात ललित मोदींचा हातभार आहे. आयपीएलच्या निर्मितीत त्यांनी खूप कष्ट घेतले. भारताने जगाला दिलेला एक देखणा आणि आपण सुरु केलेला खेळ आहे. त्यामुळे क्रिकेटच सगळे अर्थकारणच बदलून गेले. जगातील उत्तम खेळाडू आपल्या इथे खेळण्यासाठी येऊ लागले. यातून नव्या पिढीला त्यांच्या बरोबर खेळण्याची संधी मिळाली.”, अशा शब्दांत शरद पवार यांनी ललित मोदींचे कौतुक केले होते.
-
आयपीएलमध्ये ललित मोदींनी मनमानीपणे कार्यभार केल्याचा आरोप आहे. तसेच बीसीसीआयचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केल्याचा त्यांच्यावर ठपका आहे. सगळ्या आरोपांमध्ये ते दोषी आढळून आले आहेत. बीसीसीआयने ललित मोदींवर आजीवन बंदी घातली आहे.
Birthday Special : “…पवार साहेब नसते, तर IPL स्पर्धा सुरू झालीच नसती”
राजकारणासोबत क्रीडा क्षेत्रात मोठं योगदान देणाऱ्या शरद पवार यांचा आज ८१ वा वाढदिवस आहे.
Web Title: There would be no ipl without sharad pawar says lalit modi adn