-

रोहित शर्मा आणि त्याचं कुटुंब लेकाच्या पहिल्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी भारताबाहेर गेले आहेत. या सेलिब्रेशनचे फोटो रोहितची पत्नी रितिका सजदेहने शेअर केले आहेत.
-
रोहित व रितिकाच्या लेकाचा जन्म १५ नोव्हेंबर २०२४ रोजी झाला होता. लेकाच्या वाढदिवसासाठी रोहित संपूर्ण कुटुंबासह कतारला गेला आहे.
-
रितिकाच्या पहिल्या पोस्टमध्ये अहान त्याच्या खेळण्यांबरोबर खेळताना दिसत आहेत. तिथेच Happy Birthdayसुद्धा लिहिलेले फुगे आहेत.
-
दुसऱ्या फोटोमध्ये अहान, समायरा व रितिका समुद्र पाहत असल्याचा फोटो रोहितने क्लिक केला आहे.
-
अहानच्या पहिल्या वाढदिवसासाठी इतरांसह बर्थडे बॉयसाठीही खास टीशर्ट करण्यात आलं होतं. ज्याचा फोटोही शेअर केला आहे.
-
यानंतरच्या फोटोमध्ये फॅमिली सेल्फी पाहायला मिळत आहे. समायरा, रितिका व अहान या फोटोत असून रोहित सेल्फी काढताना दिसत आहे.
-
लहान भावाच्या पहिल्या वाढदिवसासाठी बहिण समायरानेही खास टीशर्ट घातलं होतं. ज्यावर अहानचा पहिला वाढदिवस लिहिलं असून कुत्रा, डायनॉसर आणि बॅटसह काही चित्र आहेत.
-
तिलक वर्मानेही सारखंच टीशर्ट घालत पोस्ट शेअर करत अहानला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.(फोटो सौजन्य-@Ritikasajdeh Instagram)
रोहित शर्माच्या लेकाचा पहिला वाढदिवस! सेलिब्रेशनचे फोटो पाहिलेत का? खास टी-शर्ट अन् डेकोरेशन; तिलक वर्माने तर…
Rohit Sharma Son 1st Birthday Celebration: रोहित शर्मा व त्याच्या कुटुंबाने लेकाचा पहिला वाढदिवस साजरा केला आहे. रितिका सहदेहने लेकाच्या पहिल्या वाढदिवसाचे फोटो शेअर केले आहेत.
Web Title: Rohit sharma son ahaan 1st birthday celebration photos viral special t shirt and tilak varma wishes bdg