• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. preston kulkarni indian origin american is democratic nominee for us congress from texas scsg

US Elections: एक कुलकर्णी अमेरिकेत लढतोय निवडणूक; महाराष्ट्रातील नेत्याशी आहे खास नातं

मराठी आणि कोकणी भाषेतही केलाय प्रचार

October 16, 2020 17:54 IST
Follow Us
  • भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक असणारे प्रेस्टन कुलकर्णी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराविरोधात निवडणूक लढवत आहे. माजी सरकारी अधिकारी असणारे कुलकर्णी यांना डेमोकॅट्रिक पक्षाने तिकीट दिलं आहे. कुलकर्णी हे राजकारणात येण्याआधी सरकारी अधिकारी म्हणून इराण आणि इस्रायलमध्ये तैनात होते. (सर्व फोटो: Twitter/SriPKulkarni वरुन साभार)
    1/

    भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक असणारे प्रेस्टन कुलकर्णी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराविरोधात निवडणूक लढवत आहे. माजी सरकारी अधिकारी असणारे कुलकर्णी यांना डेमोकॅट्रिक पक्षाने तिकीट दिलं आहे. कुलकर्णी हे राजकारणात येण्याआधी सरकारी अधिकारी म्हणून इराण आणि इस्रायलमध्ये तैनात होते. (सर्व फोटो: Twitter/SriPKulkarni वरुन साभार)

  • 2/

    कुलकर्णी हे त्यांच्या कूटनीती आणि एखादे काम निश्चयाने पूर्ण करुन घेण्याच्या गुणांसाठी ओळखले जातात. खास गोष्टमध्ये कुलकर्णी यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशीही खास नात आहे.

  • 3/

    डेमोक्रेट्स पक्षाकडून भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक योजना आखण्यात आल्या आहेत. भारतीयांना महत्वाचे वाटणारे अनेक मुद्दे या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी वापरले जात आहे.

  • 4/

    त्याचबरोबर भारतीय वंशाच्या लोकांना मतदार म्हणून आणि थेट प्रचारामध्ये सहभागी करुन घेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळेच भारतीय वंशाचे उमेदवारही काही ठिकाणी देण्यात आलं आहे. प्रेस्टन कुलकर्णी अशाच एका नावांपैकी एक आहे. टेक्साससारख्या मुख्य राज्यामधून कुलकर्णी निवडणूक लढवत आहेत. 

  • 5/

    ४१ वर्षीय कुलकर्णी रिपलब्लिकन उमेदावर ट्रॉय नेहल्सच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत.

  • 6/

    कुलकर्णी यांनी निवडणुकीमध्ये विजय मिळवल्यास टेक्सासमधून निवडूण जाणारे ते पहिले हिंदू प्रतिनिधी असतील.

  • 7/

    लोकसंख्येच्या दृष्टीने टेक्सास विविधतेने नटलेले राज्य आहे. येथील ६४ टक्के नागरिक हे गौरवर्णीय, २५ टक्के लॅटीन अमेरिकन, १७ टक्के आशियन वंशाचे नागरिक तर १२ टक्के लोकं कृष्णवर्णीय आहेत. जन गणनेच्या आधारावर ही माहिती समोर आली आहे. 

  • 8/

    वेगवेगळ्या वंशाचे लोक राहत असल्याने आशियाई भाषांमधूनही जाहिराती केल्या जात आहे. कुलकर्णी यांनी आपली जाहिरात अनेक भाषांमध्ये केली आहे यामध्ये मराठीचा ही समावेश आहे.

  • 9/

    इंग्रजी, मराठी, हिंदी, तेलगू, चीनी, पंजाबी, स्पॅनिश, नेपाळी भाषांबरोबरच अगदी कोकणी भाषेतही कुलकर्णींनी मतदारांना साद घातली आहे.

  • 10/

    सन १९६९ मध्ये कुलकर्णी कुटुंब भारतातून अमेरिकेमध्ये गेले. तेथेच १९७८ साली लुसियानामध्ये प्रेस्टन यांचा जन्म झाला. फोटोत दिसत आहेत ते प्रेस्टन यांचे आई-वडील असून हा फोटो प्रेस्टन यांनीच शेअर केलाय.

  • 11/

    कुलकर्णी यांचे वडील व्यंकटेश कुलकर्णी भारतीय उपन्यासकार आणि शिक्षण तज्ज्ञ तर आई मार्गारेट या मूळच्या वेस्ट वर्जिनियाच्या आहेत.

  • 12/

    प्रेस्टन यांना लाभलेला राजकीय वारसा हा त्यांच्या आईकडून लाभल्याचे समजते.

  • 13/

    कुलकर्णी यांची आई मार्गारेट यांचे पूर्वज १९ व्या शतकामध्ये मॅक्सिकोमधून अमेरिकेत आले आणि त्यांनी टेक्सासमधी राजकारणामध्ये सक्रिय योगदान दिलं होतं. द प्रिंटच्या वृत्तानुसार कुलकर्णी यांनीच यासंदर्भातील माहिती एका मुलाखतीमध्ये दिली आहे. 

  • 14/

    राजकीय वासरा असल्यानेचच प्रेस्टन यांच्या आई मार्गारेट या टेक्सासमध्ये दबदबा असणाऱ्या राजकीय व्यक्तीमत्वांपैकी एक आहेत. कुलकर्णी यांच्या निवडणुकीच्यासंदर्भातील वेबसाईटवरही मार्गारेट यांच्या राजकीय संघर्षाचे संदर्भ देण्यात आले आहेत.

  • 15/

    कुलकर्णी यांना वयाच्या १८ व्या वर्षीच टेक्सास विद्यापिठातील शिक्षण अर्ध्यात सोडावं लागलं. कुलकर्णी यांच्या वडिलांना रक्ताचा कर्करोग असल्याचे निष्पण्ण झाल्याने त्यांना शिक्षण सोडावे लागले.

  • 16/

    वडिलांच्या मृत्यूनंतर प्रेस्टन यांनीच आपल्या तीन लहान भावंडांची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली. फोटोत दिसणारा व्यक्ती ही कुलकर्णी यांचा धकटा भाऊ आहे.

  • 17/

    त्यानंतर कुलकर्णी यांनी हार्वर्ड विद्यापिठामधून लोकप्रशासन (पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) विषयामध्ये पदवी मिळवली.

  • 18/

    कुलकर्णी हे स्थानिकांमध्ये लोकप्रिय असण्याचे आणखीन एक कारण म्हणजे ते तरुणांशी संबंधित मुद्द्यांवर उघडपणे बोलतात आणि चर्चा करतात.

  • 19/

    स्वत: कुलकर्णी हे त्यांच्या तरुण्यामध्ये हिंसा, गुन्हेगारी विश्व यासारख्या संकटांना सामोरे गेले आङेत. सन १९९७ साली त्यांना कोकेन बाळगल्याप्रकरणी अटकही करण्यात आली होती.

  • 20/

    आपण तरुण असतानाच केलेल्या चुकांमुळे उरलेलं आयुष्य खराब करुन घेता कामा नये असं या ड्रग्स प्रकरणाविषयी बोलताना कुलकर्णी सांगतात. 

  • 21/

    सन २००३ मध्ये कुलकर्णी हे अमेरिकन परराष्ट्र सेवेच्या खात्यामध्ये रुजू झाले. इथून त्यांच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली. त्यानंतर ते इराक, इस्रायल, तैवान, जमैका आणि रशियासारख्या देशांमध्ये राजकीय अधिकारी म्हणून नियुक्त होते.

  • 22/

    अनेक भाषांवर प्रभुत्व असणाऱ्या कुलकर्णींचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी खास नात असल्याचं सांगितलं जातं. अमेरिकेमध्ये आरएसएसला हिंदू स्वयंसेवक संघ नावाने ओळखले जाते. तेथील उपाध्यक्ष असणारे रमेश भूटाडा हे कुलकर्णींचे खास मित्र आहेत. 

  • 23/

    कुलर्णी यांनी स्वत: रमेश हे मला वडिलांसमान आहेत असं म्हटलं होतं. दुसरीकडे कुलकर्णी यांनी दोन वर्षापूर्वी आपल्याला आरएसएसबद्दल काहीच माहिती नव्हती असंही म्हटलं आहे.

  • 24/

    भाजपाचे खासदार असणाऱ्या सुब्रमण्यम स्वामी यांनाही यासंदर्भात ट्विट केलं होतं. त्यानंतर कुलकर्णी यांनी आपला आरएसएसशी थेट कोणताही संबंध नसल्याचे खुलं पत्रही लिहिलं होतं. 

  • 25/

    कुलकर्णी यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे त्यांचा आरएसएसशी संबंध आहे की नाही हे ठामपणे सांगता येत नसलं तरी आणखीन एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे कुलकर्णी हे भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचा भाचा आहे. प्रमोद महाजन हे भाजपामध्ये सक्रीय होण्याआधी आरएसएसमध्ये होते.

Web Title: Preston kulkarni indian origin american is democratic nominee for us congress from texas scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.