-

झोहरान ममदानी यांनी अमेरिकेच्या प्रसिद्ध आणि ऐतिहासिक अशा न्यूयॉर्क शहराच्या महापौर पदाची निवडणूक जिंकून विक्रम केला. त्यांच्या विजयामुळे भारतीय वंशाचा आणि पहिला मुस्लीम महापौर न्यूयॉर्क शहराला मिळाला. यानिमित्ताने आता त्यांच्या पत्नी रमा दुवाजी चर्चेत आल्या आहेत.
-
रमा दुवाजी यांचे नाव हिंदूसदृश्य असल्यामुळे अनेकांना त्या भारतीय किंवा हिंदू असल्याचे वाटले. मात्र रमा दुवाजी या मूळ सीरीया आहे. सीरियन-अमेरिकन चित्रकार, ॲनिमेटर आणि सिरेमिकिस्ट आहेत.
-
रमा दुवाजी यांच्या कलेतून अनेकदा मध्य आशियातील वारसा, सामाजिक विषय त्यांच्या संस्कृतीबद्दलचे चित्रण दिसत आले आहे.
-
रमा दुवाजी यांचा जन्म टेक्सासमधील ह्युस्टन येथे ३० जून १९९७ रोजी झाला. रमा दुवाजी ९ वर्षांच्या असताना त्यांचे सीरियन कुटुंब दुबईला स्थलांतरित झाले. २०२१ साली रमा दुवाजी न्यूयॉर्क येथे कलेच्या क्षेत्रात काम करण्यासाठी आल्या.
-
रमा दुवाजी यांनी २०१९ मध्ये व्हर्जिनिया कॉमनवेल्थ युनिव्हर्सिटीमधून कम्युनिकेशन डिझाइनमध्ये ललित कला पदवी पूर्ण केली. त्यानंतर न्यूयॉर्कमधील स्कूल ऑफ व्हिज्युअल आर्ट्समधून चित्रणात मास्टर ऑफ फाइन आर्ट्स पदवी मिळवली.
-
रमा दुवाजी आणि ममदानी यांची भेट २०२१ मध्ये हिंज या डेटिंग ॲपद्वारे झाली. ऑक्टोबर २०२४ मध्ये त्यांनी दुबईमध्ये लग्न केले आणि २०२५ च्या सुरुवातीला न्यूयॉर्क सिटी क्लर्कच्या कार्यालयात एक समारंभ पार पडला.
-
रमा दुवाजी यांच्या कलेतून मध्य-पूर्वेशी संबंधित मानवतावादी आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांना संबोधित केले जाते. गाझा आणि सुदानचा उल्लेक त्यांच्या कलेतून होत असतो.
-
रमा दुवाजी यांचे पती राजकारणात असले तरी रमा दुवाजी या राजकारणापासून लांब राहून शांतपणे आपले काम करण्यावर भर देतात.
-
४ नोव्हेंबर २०२५ रोजी न्यूयॉर्क शहराच्या महापौर पदाच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर झोहरान ममदानी यांनी पत्नी रमा दुवाजी यांच्यासह त्यांच्या पालकांचे आभार मानले.
हिंदू नाव वाटणाऱ्या जोहरान ममदानी यांच्या पत्नी रमा दुवाजी कोण आहेत? जाणून घ्या माहीत नसलेल्या गोष्टी
Who is Rama Duwaji Wife of Zohran Mamdani: न्यूयॉर्क शहराचे नवे महापौर झोहरान ममदानी यांच्या पत्नी रमा दुवाजी यांच्याबद्दल बरीच चर्चा होत आहे.
Web Title: Who is rama duwaji wife of new nyc mayor zohran mamdani things you didnt know about her kvg