रोषणाईने झगमगणाऱ्या डेक्कन जिमखान्यावरील एक टुमदार वास्तू सर्वाचे लक्ष वेधून घेते. ही वास्तू ९० वर्षांची झाली असून या वास्तूमध्ये डेक्कन जिमखाना टपाल कार्यालय हे देखील सात दशकांपासून कार्यरत आहे.
ही वास्तू आहे डेक्कन जिमखाना ट्रस्टच्या मालकीची. १९२३ मध्ये ही वास्तू आकाराला आली. १९४३ मध्ये या वास्तूतील तीन हजार चौरस फूट जागेमध्ये डेक्कन जिमखाना टपाल कार्यालय सुरू झाले या घटनेलाही आता ७० वर्षे पूर्ण झाली आहेत. एका अर्थाने हे टपाल कार्यालय भाडेकरू आहे. हे कार्यालय सुरू झाले, तेव्हा त्याचे भाडे किती होते याविषयीची माहिती उपलब्ध नसली, तरी सध्या या कार्यालयाचे दरमहा ५३५ रुपये भाडे ट्रस्टला दिले जाते.
टपाल विभागाच्या कार्यकक्षेनुसार ब्रिटिश कालखंडात पुण्याचा समावेश हा ठाणे विभागामध्ये होता. त्यानंतर पुणे हा स्वतंत्र विभाग अस्तित्वामध्ये आला. आता पुणे विभागामध्ये पूर्व पुणे, पश्चिम पुणे आणि पुणे ग्रामीण असे तीन विभाग करण्यात आले आहेत. १९८४ मध्ये पश्चिम पुणे विभाग कार्यालय लोकमान्यनगर येथे कार्यान्वित झाले. डेक्कन जिमखाना टपाल कार्यालय हे या विभागांतर्गत येते. जुनी कादगपत्रे उपलब्ध नसल्यामुळे डेक्कन जिमखाना टपाल कार्यालयाचा इतिहास नेमकेपणाने सांगता येत नाही, अशी माहिती टपाल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 70 years old deccan gymkhana post office