बायकोशी भांडण करू नकोस कामावर जात जा असे समजून सांगणार्‍या मामावर भाच्याने डोक्यात कोयत्याने वार केल्याची घटना पुण्यातील जनता वसाहतमध्ये भागात घडली आहे. तर या प्रकरणाची दत्तवाडी पोलिस स्टेशन तपास करीत आहे. आरोपी मयूर दिलीप डिंबळे अटक करण्यात आली, तर देवीदास तुकाराम बेलुसे हे जखमी आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दत्तवाडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास गेवारे म्हणाले की, जनता वसाहत मधील गल्ली क्रमांक 71 मध्ये आरोपी मयूर दिलीप डिंबळे हा त्याच्या कुटुंबा सोबत राहतो. हा मागील तीन चार महिन्या पासून कामावर जात नव्हता. तो दारू पिऊन घरात भांडण करीत असत. यावरून घरातील मंडळीनी मामा देवीदास तुकाराम बेलुसे याना फोन करून सांगितले की मयूर ची समजूत काढा.

त्यानंतर मामा देवीदास हे मयूर च्या घरी येऊन समजूत काढू लागले की आरे बायकोशी भांडण करू नकोस कामावर जात जा. त्यावर मयूर चिडून मामाच्या डोक्यात कोयत्याने वार केले. यानंतर जवळ असणार्‍या लोकानी जखमी झालेल्या देवीदास मामाला जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आरोपी मयूरला अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune crime nephew attack his unkale sharp weppen nck