कोथरूड भागात एका सोसायटीत वेश्याव्यवसाय चालविणारी दलाल कल्याणी देशपांडेला पोलिसांनी अटक केली. तिला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. ए. अरगडे यांनी ८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश शुक्रवारी दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जयश्री ऊर्फ कल्याणी उमेश देशपांडे (वय ४६, रा. बालाजी निवास, पाषाण-सूस रस्ता) हिच्याविरुद्ध पुण्यातील विविध पोलीस ठाण्यात वीस गुन्हे दाखल आहेत. तिला शहरातून तडीपारदेखील करण्यात आले होते. कोथरूड भागातील एका सोसायटीत ती वेश्याव्यवसाय चालवित असल्याची माहिती कोथरूड पोलिसांना मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले-पाटील, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  राधिका फडके यांच्या मार्गदर्शनाखाली तेथे छापा टाकून तीन तरुणींची सुटका करण्यात आली होती. तिचे साथीदार रवी तपासे (वय २८) आणि दत्ता महिंद्रकर यांना अटक करण्यात आली होती. मात्र, कल्याणी पोलिसांना सापडली नव्हती.

पोलिसांना गुंगारा देणाऱ्या कल्याणीला गुरुवारी (४ जुलै) रात्री अटक करण्यात आली. तिला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. कल्याणीने अनेक तरुणींना वेश्याव्यवसायत गुंतविले आहे. उच्चभ्रू सोसायटीत ती सदनिका भाडय़ाने घेऊन साथीदारांच्या मदतीने वेश्याव्यवसाय चालविते. तिने परराज्यातील मुलींना वेश्याव्यवसायात गुंतविले आहे. तिला पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील एस. सी. शिंदे यांनी न्यायालयाकडे केली. न्यायालयाने तिला ८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sex racketeer kalyani deshpande arrested