आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रेल्वे रूळ ओलांडून खासगी शिकवणीला निघालेल्या १३ वर्षीय मुलाचा आणि सोबत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीच्या रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. ही घटना मळवली रेल्वे स्थानकात शुक्रवारी पावणेचारच्या सुमारास घडली. महेंद्र चौधरी (वय-१३ रा. मळवली) असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव असून तो रेल्वे रूळ ओलांडून जात होता, पाऊस येत असल्याने त्याला अनोळखी सतीश हुलवळे यांनी आवाज दिला. हे दोघे एकाच छत्रीमधून एकत्र रूळ ओलांडून पुढे जात होते. तेवढ्यात पुणे-इंदूर या एक्सप्रेसने या दोघांना जोरात धडक दिली यात दोघांचा ही जागीच मृत्यू झाला आहे.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्र चौधरी (वय-१३ रा.मळवली) मूळ राजस्थान, सतीश शिवराम हुलवळे  (वय-३२ रा. कार्ला) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.  महेंद्र हा खासगी शिकवणीसाठी मळवली रेल्वे स्थानकातील रेल्वे रूळ ओलांडून जात होता. सध्या मावळ आणि लोणावळा परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे त्याने पावसापासून बचाव व्हावा यासाठी त्याने छत्री घेतली होती, तो रेल्वे रूळ ओलांडत असल्याचे पाहून  सतीश याने त्याला हाक मारली आणि त्याच्या छत्रीचा आसरा घेतला.  दोघे ही एकत्र रेल्वे रूळ ओलांडून जात होते. तेव्हा, भरधाव वेगात असणाऱ्या पुणे-इंदूर या एक्सप्रेस ने दोघांना जोरात धडक दिली यात दोघांचा ही मृत्यू झाला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two dead while crossing railway track in malavali lonavala scj