आपण तोंडलीची भाजी दररोज खात नाहीत, परंतु तोंडलीची भाजी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तोंडलीच्या भाजीच्या चवीपेक्षाही त्यात जीवनसत्त्वाचा खनिज खूप मोठ्या प्रमाणात आहे.तोंडलीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात मिळते. त्यामुळे पचनशक्ती सुधारण्यासाठी तोंडली फायदेशीर आहेत. तोंडली लिव्हरच्या समस्यांवर देखील हे गुणकारी आहे. यामुळे आपल्या नियमित आहारात तोंडल्यांचा समावेश असणे आवश्यक आहे. याच तोंडलीची जबरदस्त अशी रेसिपी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. चला पाहूयात मोठ्यांसोबत लहान मुलांना आवडेल अशी स्वादिष्ट “तोंडली मसाला” भाजी कशी बनवायची.

तोंडली मसाला साहित्य

१/२ किलो तोंडली
१ कांदाबारीक
कोथिंबिर बारीक चिरून
२ टीस्पून तिखट, हळद चिमूटभर, मीठ चवीनुसार १ टीस्पून धनेपुड पूड
२ टीस्पून आले-लसूण पेस्ट
२ टेबलस्पून तेल
३,४ टीस्पून चणादाळ

तोंडली मसाला कृती

१. सर्वप्रथम तोंडली स्वच्छ धुऊन घ्या आणि लांब चिरून घ्या. त्यानंतर तेलात तळून काढून घ्या. आता एका भांड्यात तेल गरम करून बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो परतून घ्या आणि वरुन कोथिंबीर आणि चणाडाळ ते फोडणी देऊन त्यानंतर कमी गॅसमध्ये शिजू देऊ.

२. आता आला लसूण पेस्ट तिखट मीठ आणि सगळे मसाले घालून तोंडली मॅरिनेट करुन परतून घेऊ आणि झाकून दहा मिनिटं शिवजूया.

हेही वाचा >> भज्यांचा धुंवाधार पाऊस; पावसाळ्यात ही रेसिपी नक्की ट्राय करा, नोट करा सोपी मराठी रेसिपी

३. एक ग्लास पाणी घालून पुन्हा दहा मिनिटे शिजू देऊ. आता वरून कोथिंबीर घालून मस्त एक वाफ काढून घ्या.

४. अशाप्रकारे चमचमीत असा गरमागरम तोंडली मसाला भाजी तयार आहे.