Premium

ChatGpt च्या माध्यमातून इंजिनिअरिंगच्या पेपरमध्ये केली कॉपी ,कमवले १ कोटींहून अधिक रुपये; नेमकं काय केलं?

गेल्या वर्षी ओपनएआय कंपनीने आपला ChatGpt हा AI चॅटबॉट लॉन्च केला आहे.

accused use chatgpt for fraud in civi service exam
सिव्हिल सर्व्हिस परीक्षेत फसवणुकीचा ChatGpt चा वापर (Image Credit-Freepik)

गेल्या वर्षी ओपनएआय कंपनीने आपला ChatGpt हा AI चॅटबॉट लॉन्च केला आहे. त्यापाठोपाठ अनेक कंपन्यांनी याच्याशी स्पर्धा करण्यासाठी आपले चॅटबॉट देखील लॉन्च केले आहेत. गुगलने देखील आपला Bard लॉन्च केले आहे. याचा अनेक विद्यार्थी आपला अभ्यास पूर्ण करण्यासाठी वापरत होते. त्यानंतर अनेक विद्यापीठांनी यावर बंदी घातली आहे. आता AI बाबत अजून एक मोठी बातमी समोर आली आहे. सिव्हिल सर्व्हिसेसच्या इच्छुकांनी चॅटजीपीटीचा वापर सिस्टीमची फसवणूक करण्यासाठी केला आहे. जाणून घेऊयात संपूर्ण प्रकरण.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तेलंगणा लोकसेवा आयोग (TPSC) सध्या एका घोटाळ्याची चौकशी करत आहे. जो सर्वात मोठ्या घोटाळ्यांपैकी एक असू शकतो. देशामध्ये पहिल्यांदाच सिव्हिल सर्व्हिस करू इच्छित असणाऱ्याने सिस्टिमला फसवण्यासाठी ChatGPT चा वापर केला आहे. प्रश्नपत्रिका लीक झाल्याच्या प्रकरणामध्ये स्थापित करण्यात आलेल्या एसआयटीला यामध्ये AI चा वापर करण्यात आल्याचे कळले आहे. याबाबतचे वृत्त बिझनेस टूडेने दिले आहे.

हेही वाचा : UPI पेमेंट करताना फसवणूकीपासून कसे सुरक्षित राहावे? जाणून घ्या ‘या’ सोप्या स्टेप्स

टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, आरोपींमधील एक आरोपीने तेलंगणा राज्य अभियंता) याने सहाय्यक कार्यकारी अभियंता (AEE) आणि विभागीय लेखा अधिकारी (DAO) च्या लीक झालेल्या प्रश्नपत्रिकांची उत्तरे देण्यासाठी ChatGPT चा वापर केला. हा आरोपी उत्तर पॉवर वितरण कंपनी लिमिटेडमध्ये विभागीय अभियंता आहे.

फसवणुकीसाठी केला ब्लूटूथ इअरबड्सचा वापर

फसवणूक करण्यासाठी ब्लूटूथ इअरबड्सचा वापर करण्यात आला होता. २२ जानेवारी आणि २६ फेब्रुवारी रोजी झालेल्या दोन वेगवेगळ्या परीक्षांमध्ये सात उमेदवारांना उत्तरे सांगण्यासाठी एक मोठा प्लॅन आखला होता. या सात जणांनी आपली जागा सुरक्षित करण्यासाठी तब्बल ४० लाख रुपयांची रक्कम दिली होती. कथित गुन्हेगाराने ३५ उमेदवारांना त्यांच्या संबंधित परीक्षेत फसवणूक करून १० कोटी रुपये कमावण्याचे टार्गेट ठेवले होते.

हेही वाचा : व्हॉट्सअ‍ॅपने iPhone युजर्ससाठी लॉन्च केले ‘हे’ फीचर, आता एकाच वेळी चार आयफोनवर…, जाणून घ्या

परीक्षा केंद्रातील एक मुख्याध्यापक रमेशला प्रश्नपत्रिकेचे फोटो लीक करत होते. आता लीक झालेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे मिळवण्यासाठी आरोपीने ChatGpt चा वापर केला आणि ब्लूटूथ इअरबड्सचा वापर करून पैसे देणाऱ्या उमेदवारांना उत्तरे पाठवली. महत्वाची गोष्ट म्हणजे, आरोपीला सहाय्यक अभियंता (सिव्हिल) परीक्षेसाठी चॅटजीपीटीची आवश्यकता नव्हती कारण त्याला वीज विभागातील एक कनिष्ठ सहाय्यक आणि त्याचे नातेवाईक यांच्याकडून लीक झालेली प्रश्नपत्रिका आधीच मिळाली होती. आरोपीने लीक झालेली प्रश्नपत्रिका ३० पेक्षा जास्त उमेदवारांना विकल्या होत्या. त्यामधील प्रत्येक उमेदवाराने २५ लाख ते ३० लाख रुपये इतकी मोठी रक्कम दिली होती. पोलिसांनी याबाबत खुलासा केला. पोलिसांना या प्रकरणाचा उलगडा होण्यापूर्वीच आरोपीने सुमारे १.१ कोटी रुपयांची रक्कम बळकावली होती.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Accused use chatgpt in state civil services tspsc allegedly earned 1 1 crore check details tmb 01