अनेकदा फोनवर येणारे स्पॅम आणि टेलिमार्केटिंग कॉल्स वापरकर्त्यांना त्रास देतात. अनेकवेळा अशी वेळ येते जेव्हा तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या मीटिंगमध्ये किंवा कामात अडकलेले असता तेव्हा असे कॉल्स नेहमी त्रास देतात. काहीवेळा या कॉल्सकडे दुर्लक्ष करण्याच्या नादात काही महत्त्वाचे चुकतात. अशा परिस्थितीत, आपली इच्छा असेल तर आपण आपल्या फोनमध्ये डू नॉट डिस्टर्ब हे फीचर सक्रिय करू शकता. ही सुविधा जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया सिममध्ये आहे. आज आपण जाणून घेऊया हे फीचर कसे सुरु करायचे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
जिओमध्ये डू नॉट डिस्टर्ब कसे सक्रिय करावे
- जर जिओ वापरकर्त्यांना स्पॅम कॉल्स टाळायचे असतील तर त्यासाठी प्रथम फोनमधील माय जिओ अॅप (My Jio) डाउनलोड करा.
- अॅप उघडा आणि लॉग इन केल्यानंतर, डाव्या बाजूला सेटिंग्ज बटणावर क्लिक करा.
- तुम्ही सेटिंग्जवर क्लिक करताच, तुम्हाला DND म्हणजेच डू नॉट डिस्टर्बचा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा.
- यानंतर, कंपनीकडून तुमच्या नंबरवर एक संदेश येईल ज्यामध्ये माहिती दिली जाईल की तुमच्या नंबरवर ७ दिवसांच्या आत डू नॉट डिस्टर्ब सेवा सक्रिय होईल.
वोडाफोन-आयडियामध्ये डू नॉट डिस्टर्ब कसे सक्रिय करावे
- वोडाफोन-आयडिया वापरकर्ते कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन डू नॉट डिस्टर्ब सक्रिय करू शकतात.
- डू नॉट डिस्टर्ब वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा फोन नंबर तिथे टाकावा लागेल.
- तुमच्या फोनवर एक ओटीपी येईल, तो प्रविष्ट करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
- या प्रक्रियेनंतर तुमच्या नंबरवर डू नॉट डिस्टर्ब सक्रिय होईल. वेबसाइटला भेट देऊन तुम्ही तुमच्या नंबरवरील डू नॉट डिस्टर्बचा इतिहास देखील तपासू शकता.
एअरटेलमध्ये डू नॉट डिस्टर्ब कसे सक्रिय करावे
- यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एअरटेलच्या वेबसाइटवर जावे लागेल.
- जिथे तुम्हाला एअरटेल मोबाईल सर्व्हिस (Airtel Mobile Service) या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- यानंतर स्क्रीनवर एक पॉप-अप बॉक्स दिसेल, तिथे तुमचा नंबर टाका.
- तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. हा ओटीपी टाकल्यानंतर स्टॉप ऑल पर्यायावर क्लिक करा.
- असे केल्याने तुमच्या मोबाईल नंबरवर डू नॉट डिस्टर्ब सेवा सक्रिय होईल.
First published on: 24-06-2022 at 18:24 IST
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Annoyed by spam calls get rid of unwanted calls using do not disturb feature pvp