BSNL देतेय फक्त ६ रुपयात दररोज २ जीबी डेटा आणि मोफत कॉल; जाणून घ्या कसा घ्याल फायदा

बीएसएनएलने जिओला टक्कर देत, स्वस्त आणि फायदेशीर असा रिचार्ज प्लॅन आणला आहे. या प्लॅनचा फायदा कसा घ्यावा यासाठी जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया.

BSNL देतेय फक्त ६ रुपयात दररोज २ जीबी डेटा आणि मोफत कॉल; जाणून घ्या कसा घ्याल फायदा
बीएसएनएलचा स्वत रिचार्ज प्लॅन (फोटो : प्रातिनिधिक)

खाजगी दूरसंचार कंपन्या त्यांच्या प्रीपेड रिचार्जच्या किमतीत वाढ करत असताना, सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी बीएसएनएल अजूनही त्यांचे प्रीपेड रिचार्ज प्लॅन जुन्या किमतीत देत आहे. बीएसएनएलकडे अशा अनेक योजना आहेत ज्या रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्हीआयला टक्कर देतात. तर आज आम्ही तुम्हाला बीएसएनएलच्या अशाच एका प्लानबद्दल सांगणार आहोत जो स्वस्त असण्यासोबतच खूप फायदेशीर देखील आहे

बीएसएनएल (BSNL) सर्वात स्वस्त योजना

आज आम्‍ही तुम्‍हाला अशाच एका बीएसएनएल प्‍लॅनबद्दल माहिती देणार आहोत, जो तुम्‍हाला केवळ ६ रुपये १ पैशात २ जीबी डेटा देईल. जाणून घ्या कोणती आहे ही योजना आणि त्याचे फायदे.

बीएसएनएल (BSNL) ६६६ प्रीपेड प्लॅन

बीएसएनएलचा ६६६ रुपयांचा प्लान फक्त प्रीपेड ग्राहकांसाठी आहे. या रिचार्जमध्ये वापरकर्त्यांना ११० दिवसांची संपूर्ण वैधता मिळते. जर आपण दैनंदिन खर्चाबद्दल बोललो, तर ग्राहकांना हा प्लॅन ६ रुपये १ पैसे खर्चात मिळेल. त्याचबरोबर प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा दिला जातो. त्यानुसार एकूण डेटा २२० जीबी होतो.

मोफत कॉलिंग

यासोबतच प्लॅनमधील सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि १०० एसएमएस सेवा उपलब्ध आहे. याशिवाय मोफत कॉलरट्यून्स आणि लोकधुन कंटेंटचे सदस्यत्व देखील या प्लॅनद्वारे दिले जाते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bsnl offers 2 gb data and free calls daily for only rs 6 learn how to take advantage gps

Next Story
Google तुमचे बोलणे चोरून तर ऐकत नाही ना? जाणून घ्या का दिसतात आपण बोललेल्या प्रत्येक गोष्टीच्या जाहिराती
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी