फ्रान्स युनिव्हर्सिटीने ChatGpt वर घातली बंदी, म्हणाले याचा वापर करणाऱ्यांना... | chatgpt banned by the france university and chatgpt is a big competitionto google | Loksatta

फ्रान्स युनिव्हर्सिटीने ChatGpt वर घातली बंदी, म्हणाले याचा वापर करणाऱ्यांना…

ChatGpt हे गुगलसाठी सर्वात मोठा धोका असल्याचे सांगितले जात आहे.

chatgpt reply on whatsapp mesaage
ChatGpt- संग्रहित छायाचित्र / द इंडियन एक्सप्रेस

ChatGpt : सध्याच्या काळात ChatGpt हे सध्या खूप चर्चेत असलेला विषय आहे. हे माध्यम असे आहे की तुम्ही जे त्याला विचाराल त्याचे त्याच्याकडे असलेल्या माहितीरून तो आपल्याला उत्तर देईल. सध्या ते इंग्रजी भाषेवर काम करते. हे भविष्यात इतर भाषांमध्ये जोडले जाऊ शकते. काही जण चॅटजीपीटीला चांगले म्हणत आहेत तर, काही जण याला वाईट देखील म्हणत आहेत. हा एक कृत्रिम चॅटबॉट आहे. ChatGPT हे गुगलसाठी सर्वात मोठा धोका असल्याचे सांगितले जात आहे.

फ्रांसमधील युनिव्हर्सिटींपैकी एक Science Po या युनिव्हर्सिटीने ChatGPT च्या वापरावर बंदी घातली आहे. या युनिव्हर्सिटीच्या म्हणण्यानुसार याच्या मदतीने ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढू शकतात आणि मूळ डेटा चोरीला जाऊ शकतो. ChatGPT वापर करणाऱ्यांना युनिव्हर्सिटीमधून काढून टाकले जाऊ शकते आणि त्यांच्या उच्च शिक्षणावरही बंदी घातली जाऊ शकते, असे युनिव्हर्सिटीकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : Smartphones खरेदी करण्याचा विचार करताय?, १५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा ‘हे’ बेस्ट फोन

ChatGPT हे सुरुवातीपासून डेटा चोरीच्या बाबतीत संशयित आहे आणि तो चिंतेचा विषय आहे. हे माध्यम कोणत्याही विषयावर कमी कालावधीमध्ये माहिती देण्यास सक्षम आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी सर्वात जास्त चॅटजीपीटीचा करताना दिसत आहेत. याच्या मदतीने अभ्यास आणि नोट्स तयार करत आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 12:41 IST
Next Story
Smartphones खरेदी करण्याचा विचार करताय?, १५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा ‘हे’ बेस्ट फोन