फ्लिपकार्ट बिग बिलिअन सेल २०२२ लवकरच सुरू होणार आहे. या सेलमध्ये कोणकोणत्या वस्तुंवर सुट मिळणार याची माहिती जाहीर करण्यात आली आहे. फ्लिपकार्टचा हा सेल बराच लोकप्रिय आहे. या सेलची ग्राहक उत्सुकतेने वाट बघत असतात. या सेलमध्ये मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सवर सूट दिली जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फ्लिपकार्टकडुन रिअलमी, पोको, विवो, सॅमसंग आणि आयफोन मॉडेल्सवर सूट दिली जाणार आहे. याशिवाय ग्राहकांना इतर इलेक्ट्रॉनिक्स आणि अॅक्सेसरीजच्या खरेदीवर ८० टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल २०२२ लवकरच सुरू होणार आहे. बिग बिलियन डेज सेलसाठी तयार केलेल्या मायक्रोसाइटमध्ये अद्याप विक्रीच्या तारखांचा उल्लेख केलेला नाही. परंतु फ्लिपकार्टने या सेलमधुन ग्राहल काय अपेक्षा करू शकतात हे सूचित केले आहे. मायक्रोसाइटवर दिलेल्या माहितीनुसार इलेक्ट्रॉनिक्स, अॅक्सेसरीज आणि टीव्ही यांसारख्या अनेक उत्पादनांवर ८० टक्क्यांपर्यंत सूट मिळेल.

आणखी वाचा : फक्त ४२ रुपयांमध्ये डेटासह कॉलिंगची सुविधा! बीएसएनएलचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन जाणून घ्या

फ्लिपकार्टने ऍक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँकसोबत पार्टनरशिप केली आहे, ज्यामुळे या सेलमध्ये काही प्रोडक्ट्सवर इन्स्टंट १० टक्क्यांची सूट मिळू शकते. कॅशबॅक ऑफरसाठी फ्लिपकार्टने पेटिएमसोबत पार्टनरशिप केली आहे. अमर्यादित कॅशबॅक ऑफर मिळवण्यासाठी तुम्ही फ्लिपकार्ट ऍक्सिस बँक क्रेडिट कार्ड वापरू शकता. तसेच कंपनीने दिलेल्या माहितीनुसार फ्लिपकार्ट पे लेटर वापरून इस्टंट क्रेडिट आणि ईएमआय ऑफर वापरू शकता.

अनेक आयफोन मॉडेल्स तसेच रिअलमी, पोको, विवो आणि सॅमसंग कंपनीचे फोन सवलतीच्या दरात उपलब्ध असतील. स्मार्टफोनच्या स्क्रीन गार्डसह अॅक्सेसरीज ९९ रुपयांपासुन सुरू होतील. गेमिंग लॅपटॉप ४० टक्के सवलतीसह उपलब्ध असतील आणि फ्लिपकार्ट बिग बिलियन डे 2022 सेल दरम्यान इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर ७५ टक्के सूट दिली जाईल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flipkart big billion days sale 2022 will start soon know discounts and offers pns