Multiple Bank Account: एका व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त बँक खाती असण्याचे काय फायदे आणि तोटे आहेत?

एका पेक्षा जास्त बचत खाती असण्याचे फायदे आणि तोटे आहेत. याबद्दल आपण इथे तपशीलवार चर्चा करू.

Multiple-Bank-Account

अनेकदा लोकांची एकापेक्षा जास्त बँक खाती असतात. काही लोक ते त्यांच्या गरजांसाठी ठेवतात, तर काही लोक फक्त दोन किंवा तीन खाती वापरतात. विशेषतः बँकिंग क्षेत्र डिजिटल झाल्यापासून खाते उघडणे सोपे झाले आहे.

तुम्ही घरबसल्या आरामात ऑनलाइन किंवा मोबाईल अॅप्सद्वारे बचत खाती उघडू शकता. तुम्ही ऑनलाइन अर्ज देखील करू शकता, व्हिडिओ केवायसी पूर्ण करून काही मिनिटांत तुम्ही तुमचं खातं उघडू शकता. एका पेक्षा जास्त बचत खाती असण्याचे फायदे आणि तोटे आहेत. याबद्दल आपण इथे तपशीलवार चर्चा करू.

रिवॉर्ड आणि डिस्काउंटचे फायदे
बहुतेक बँका लॉकर, विमा, प्रीमियम डेबिट कार्ड आणि इतर विशेषाधिकार यासारख्या सुविधा देतात ज्या तुम्ही वापरू शकता. या व्यतिरिक्त, खातेदाराला युटिलिटी पेमेंट, शॉपिंग आणि ईएमआय पेमेंटवर रिवॉर्ड आणि डिस्काउंट देखील मिळते. त्यामुळे अनेक खाती ठेवून, तुम्ही तुमची बचत वाढवू शकता. बर्‍याच बँका एखाद्या स्पेशल सेल किंवा खरेदीवर अधिक सवलत देतात.

आणखी वाचा : Reliance Jio देतेय दररोज ३ GB डेटा आणि अनलिमिटेड कॉल ऑफर, १ वर्षासाठी Hotstar पाहा मोफत

पैसे काढण्याच्या मर्यादेतून सूट
बँकांकडून दरमहा एटीएममधून मोफत पैसे काढण्याची संख्या मर्यादित करण्यात आली आहे. एकापेक्षा जास्त खाती तुम्हाला इतर अनेक एटीएमसह व्यवहार करण्याची आणि व्यवहारावर आकारण्यात येणाऱ्या चार्जेसमध्ये बचत करण्याची परवानगी देतात. एटीएमचा वारंवार वापर करणाऱ्यांसाठी हे विशेषतः फायदेशीर आहे.

आणखी वाचा : Flipkart Big Bachat Dhamaal Sale: विवो, सॅमसंग, पोको आणि मोटोरोला फोनवर बंपर सूट, हजारोंची बचत

विशेष कामांसाठी खाते
परदेशी प्रवास, वाहन खरेदी आणि उच्च शिक्षण यासारखी उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी अनेक व्यक्ती वेगवेगळ्या बचत खात्यांमध्ये पैसे जमा करतात. काही कुटुंबातील सदस्यांसाठी फक्त दैनंदिन खर्चासाठी जॉइंट अकाउंट उघडतात. बरेच लोक आकस्मिक किंवा आपत्कालीन निधीच्या स्वरूपात स्वतंत्र खाते देखील ठेवतात.

बँकिंग पार्टनर ऑफर
विविध ऑनलाइन आणि ई-कॉमर्स पोर्टल्स त्यांच्या ग्राहकांना स्पेशल डील आणि ऑफर देण्यासाठी बँकेशी करार करतात. तुम्ही वेगवेगळ्या बँकांमधील एकापेक्षा जास्त खात्यांसह अशा ऑफरचा लाभ घेऊ शकता.

सुरक्षा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची उपकंपनी असलेल्या डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनद्वारे बँकेतील ५ लाख रुपयांपर्यंतच्या रकमेचा विमा उतरवला जातो. जेव्हा एखादी बँक ग्राहकांना एखादी रक्कम भरण्यात अपयशी ठरते तेव्हा खातेदारांकडे असलेली रक्कम कॉर्पोरेशन कव्हर करते.

जर तुमची ठेव रक्कम ५ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर संपूर्ण पैसे एका बँकेत ठेवणे धोक्याचे असू शकते. वेगवेगळ्या बँकांमध्ये निधी जमा केल्याने त्या प्रत्येकाला स्वतंत्रपणे विम्याचे संरक्षण मिळेल याची खात्री होईल. डिफॉल्टच्या बाबतीत, जिथे प्राथमिक खाते असेल अशा बाबतीत बँक बॅकअप म्हणून अशी खाती वापरू शकते.

हे आहेत नुकसान
एकापेक्षा जास्त खाती असण्याचे अनेक तोटे सुद्धा आहेत. एकाच वेळी अनेक खाती मॅनेज करणे कठीण आहे. शिवाय, प्रत्येक खात्यावर मेंटेनेंस फी देखील आकारली जाते. मग ते एटीएम चार्ज असो किंवा किमान रकमेची समस्या. या समस्या एकापेक्षा जास्त खाती ठेवल्याने कायम राहतात.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Money saving tips what are the advantages of having more than one bank account with one person prp

Next Story
Reliance Jio देतेय दररोज ३ GB डेटा आणि अनलिमिटेड कॉल ऑफर, १ वर्षासाठी Hotstar पाहा मोफत
फोटो गॅलरी