फोन पे हे एक पेमेंट अ‍ॅप आहे. भारत सरकारने UPI सिस्टीम सुरू केल्यापासून भारतात ऑनलाईन व्यवहार वाढत आहेत. UPI आधारित अनेक Apps गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. PhonePe हे एक UPI आधारित अ‍ॅप आहे, UPI ही सेवा NPCI द्वारे ऑपरेट केली जाते. भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म पैकी एक असणाऱ्या फोन पे ने आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन फिचर लाँच केले आहे. फोन पेच्या या नवीन फीचरमुळे वापरकर्ते केवळ भारतातच नव्हे तर, इतर देशांमध्येही UPI द्वारे सहज पेमेंट करू शकणार आहेत. म्हणजे फोन पे तुम्हाला आंतरराष्ट्रीय व्यवहार करण्यास मम्दत करणार आहे. फोन पे ही पहिली कंपनी आहे जिने वापरकर्त्यांसाठी हे उपयुक्त फिचर तयार केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फोन पे ने आणलेले हे फिचर परदेशात जाणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त आहे. इतर देशांमध्ये प्रवास करताना तुम्ही PhonePe अ‍ॅपवरून UPI द्वारे प्रदेश व्यापाऱ्यांना , लोकांना सहज पैसे देऊ शकणार आहात. हे व्यवहार तुमच्या आंतरराष्ट्रीय डेबिट कार्डप्रमाणेच काम करणार आहे. पेमेंट केल्यावर तुमच्या बँक खात्यामधून परकीय चलन कापले जाणार आहे.

हेही वाचा : Bard Google: ChatGpt चं टेन्शन वाढलं, गुगल लवकरच लॉन्च करणार ‘बार्ड’

सध्या सुरुवातीच्या काळात या फीचरचा उपयोग संयुक्त अरब आमिराती तसेच मॉरिशस , सिंगापूर , भूतान आणि नेपाळ सर्व आंतरराष्ट्रीय व्यापारी ज्यांच्याकडे स्थानिक QR कोड आहे ते या फीचरचा लाभ घेऊ शकणार आहेत. येणाऱ्या काळामध्ये UPI आंतरराष्ट्रीय सेवा इतर देशांमध्येही लॉन्च होण्याची शक्यता आहे. या फीचरमुळे प्रदेशात पैसे भरण्यासाठी क्रेडिट कार्ड किंवा फॉरेक्स कार्डची गरज भासणार नाही. फोन पे वापरकर्त्याने UPI आंतरराष्ट्रीय पेमेंट करण्यासाठी UPI शी लिंक केलेले बँक खाते सक्रिय करणे आवश्यक आहे.या फीचरला अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी त्यांचा UPI पिन टाकणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New feature of phonepe users will be able to make international payments tmb 01
First published on: 07-02-2023 at 15:17 IST