Google AI updates:  सध्याच्या काळात ChatGpt हे सध्या खूप चर्चेत असलेला विषय आहे. हे माध्यम असे आहे की तुम्ही जे त्याला विचाराल त्याचे त्याच्याकडे असलेल्या माहितीरून तो आपल्याला उत्तर देईल. सध्या ते इंग्रजी भाषेवर काम करते. हे भविष्यात इतर भाषांमध्ये जोडले जाऊ शकते. चॅटजीपीटी हे गुगलशी स्पर्धा करत आहे. त्यामुळे गुगलची चिंता वाढली आहे. मात्र याच्याशी स्पर्धा करण्यासाठी गुगलसुद्धा लवकरच आपला चॅटबॉट लॉन्च करणार आहे. ChatGPT ला टक्कर देण्यासाठी गूगल आपल्या AI वर वेगाने काम करत आहे. गुगलने आपल्या चॅटबॉटला बार्ड असे नाव दिले आहे. येत्या काही दिवसांत ते सर्वांसाठी लॉन्च करण्यात येणार आहे.

लवकरच चॅटजीपीटीसोबत स्पर्धा करण्यासाठी Bard लॉन्च केले जाईल असे गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितले. सध्या वापरकर्त्यांच्या फीडबॅकसाठी ते सुरु करण्यात आले आहे. कंपनीने सध्या वापरकर्त्यांचा फीडबॅक घेण्यासाठी बार्ड नावाची AI सेवा सुरु केली असून सर्व चाचण्या पूर्ण झाल्या की ते सर्वांच्या वापरासाठी लॉन्च करण्यात येणार आहे असे सुंदर पिचाई यांनी सांगितले.

हेही वाचा : ChatGpt वापरणाऱ्यांच्या खिशाला लागणार कात्री, मोजावे लागणार ‘इतके’ पैसे; जाणून घ्या

ChatGpt गुगलसाठी धोकायदायक

याशिवाय गुगल आपल्या सर्च इंजिनमध्ये AI हे फिचर जोडण्याच्या दृष्टीने काम करत आहे. सीईओ सुंदर पिचाई यांच्या मते बार्ड सुरुवातीला LaMDA च्या सोप्या व हलक्या सिरीजवर काम करेल. ज्यासाठी काम्प्युटरची ताकद कमी प्रमाणात वापरावी लागते. यामुळे जास्तीत जास्त वापरकर्ते याचा वापर करू शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या वर्षी OpenAi ने ChatGpt मायक्रोसॉफ्टच्या मदतीने लाँच केले. चॅटजीपीटी दिग्गज कंपनी असणाऱ्या गुगलची धोकादायक ठरले आहे. मात्र आता गुगल देखील चॅटजीपीटीला टक्कर देण्यासाठी जोरदार तयारी करत आहे.