पेटीएम घेतंय मोबाईल रिचार्जवर पैसे ; जाणून घ्या कोणते ॲप देत आहेत मोफत सेवा

पेटीएम आता मोबाईल रिचार्जवर शुल्क आकारत आहे. यामुळे जाणून घेऊया इतर ऑनलाईन ॲपच्या शुल्काबद्दल.

पेटीएम घेतंय मोबाईल रिचार्जवर पैसे ; जाणून घ्या कोणते ॲप देत आहेत मोफत सेवा
पेटीएम आता मोबाईल रिचार्जवर शुल्क आकारत आहे. यामुळे जाणून घेऊया इतर ऑनलाईन ॲपच्या शुल्काबद्दल ( फोटो : indian express )

सध्या ऑनलाईन पेमेंटचा वापर जास्त केला जातोय. मोबाईल रिचार्जपासून ते वीज बिल भरण्यापर्यंत ऑनलाईन पेमेंट केले जाते. त्यासाठी वेगवेगळे ॲप आहेत ज्याचा आपण वापर करतो. पेटीएम हे त्यापैकीच एक आहे. पण, अलीकडेच लक्षात आलंय की पेटीएम ॲपमधून मोबाईल रिचार्ज महाग झाला आहे. वास्तविक, डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएम काही वापरकर्त्यांकडून यूपीआय, क्रेडिट कार्ड आणि वॉलेटच्या रिचार्जवर प्रक्रिया शुल्क म्हणून १ ते ६ रुपये आकारत आहे. जर तुम्ही देखील पेटीएम युजर्स असाल आणि वाढीव ट्रान्झॅक्शन फीमुळे त्रस्त असाल , तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही डिजिटल पेमेंट ॲप्सबद्दल माहिती देणार आहोत, ज्यातून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारण्यात येणार नाही.

ॲमेझॉन पे

ॲमेझॉन पे ऑनलाईन पेमेंटचे एक ॲप आहे. ज्याची सुरुवात २००७ मध्ये ॲमेझॉन कडून करण्यात आली आहे. भारतात त्याची सुरुवात कालांतराने झाली. बिल भरण्यापासून ते शॉपिंगपर्यंत ॲमेझॉन पे द्वारे पेमेंट करता येते. तसंच मोबाईल रिचार्ज देखील केला जाऊ शकतो. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे असे केल्याने, कोणत्याही प्रकारचे शुल्क ॲमेझॉन पे कडून आकारण्यात येत नाही. तुम्ही तुमचा मोबाईल वॉलेट, यूपीआय आणि डेबिट , क्रेडिट कार्डद्वारे रिचार्ज करू शकता.

जी पे

तुम्ही जिओ , एअरटेल , वीआयचे ग्राहक असल्यास, तुम्ही कोणतेही अतिरिक्त पैसे न भरता जीपेवर मोबाईल रिचार्ज करू शकता. याशिवाय तुम्ही या ॲपवरून तुमचे वीज बिल, गॅस बिल आणि डीटीएच रिचार्ज यांसारखे बिल देखील भरू शकता. त्यामुळे प्रीपेड ग्राहकांसाठी, मोबाईल रिचार्जसाठी जीपे हा एक उत्तम पर्याय आहे.

टाटा नेउ

टाटा नेउ ॲप नुकतेच लाँच करण्यात आले आहे, जे तुम्हाला किराणा मालापासून ते गॅजेट्सपर्यंत सर्व काही एकाच ठिकाणी शोधून देते . यासह, टाटा पेद्वारे, तुम्ही कोणत्याही प्रकारच्या ऑनलाइन आणि इन-स्टोअर खरेदीसाठी त्वरित पेमेंट करू शकता. त्याच वेळी, तुम्ही कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय या ॲपवरून तुमचा मोबाइल रिचार्ज देखील करू शकता. तुम्हाला फक्त रिचार्जचा खर्च भरावा लागेल.

भीम

भीम ॲपने रिचार्ज करणे खूप सोपे आहे. भीम क्रेडिट कार्ड आणि यूपीआय वापरून प्रीपेड मोबाइल कोणत्याही प्रक्रिया शुल्काशिवाय करू शकतात. पेटीएम आणि गुगल पे सोबत, भीम ॲप हे भारतातील सर्वात लोकप्रिय आणि मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे पेमेंट ॲप आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
जिओनंतर एअरटेल वापरकर्त्यांना मोठा झटका ! आता ‘हा’ फायदा रिचार्ज प्लॅनवर मिळणार नाही
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी