Premium

Realme ने नवीन व्हेरिएंटमध्ये लॉन्च केला ‘हा’ स्मार्टफोन; १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि.., जाणून घ्या

रिअलमीच्या हा नवीन स्मार्टफोनमध्ये ६.७४ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे.

realme c53 launch
Realme C53 मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप मिळतो. (Image Credit- @realmeIndia/Twitter)

Realme ही एक लोकप्रिय मोबाइल उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन स्मार्टफोन्स लॉन्च करत असते. काही कालावधीपूर्वी कंपनीने आपला Realme C53 हा फोन लॉन्च केला होता. कंपनीने हाच स्मार्टफोन आता नवीन व्हेरिएंटमध्ये लॉन्च केला आहे. हा फोन आधी ४/१२८ जीबी आणि /६४ जीबी या दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला होता. आता कंपनीने हा फोन ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजमध्ये लॉन्च केला आहे. याची किंमत., फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Realme C53 : स्पेसिफिकेशन्स

रिअलमीच्या हा नवीन स्मार्टफोन ड्युअल सिम (नॅनो), अँड्रॉइड १३ आधारित Realme UI T वर चालतो. यामध्ये ६.७४ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट हा ९० Hz इतका आहे. हा फोन १.८२ GHz पीक फ्रिक्वेन्सीसह ऑक्टा कोअर १२ nm चिपसेटद्वारे समर्थित आहे. तसेच यात ६ जीबी पर्यंत LPDDR4X रॅम आणि ARM Mali-G57 GPU सह जोडण्यात आले आहे. यामध्ये १२ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. रिअलमीने हा फोन चॅम्पियन गोल्डन आणि चॅम्पियन ब्लॅक या दोन रंगांमध्ये ऑफर केला आहे. याबाबतचे वृत्त gadgets360 ने दिले आहे.

हेही वाचा : Realme ने लॉन्च १०८ मेगापिक्सलचा जबरदस्त कॅमेरा असणारा ‘हा’ स्मार्टफोन, किंमत १० हजारांपेक्षा कमी

Realme C53 मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये १०८ मेगापिक्सल AI समर्थित प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. १०८ मेगापिक्सलचा सेन्सर मिळवणारा हा सेगमेंटचा पहिला हँडसेट असल्याचा दावा केला जात आहे. ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळणार आहे. तसेच यात १२८ जीबी स्टोरेजचा पर्याय मिळतो. जे मायक्रोएसडी कार्डद्वारे २ टीबी पर्यंत वाढवता येते. Realme C53 मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 4G, GPS/AGPS, Wi-Fi, Bluetooth 5, 3.5mm हेडफोन जॅक आणि USB Type-C पोर्ट यांचा समावेश आहे.

Realme C53: भारतातील किंमत आणि उपलब्धता

६ जीबी रॅम आणि १२८ जीबी या नवीन व्हेरिएंटमध्ये लॉन्च झालेला रिअलमी सी ३ ची किंमत १०,९९९ रुपये आहे. हा फोन रिअलमी.कॉम आणि फ्लिपकार्टच्या माध्यमातून खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. याची विक्री २० सप्टेंबरपासून दुपारी १२ वाजता सुरु होईल. Realme C53 च्या ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ९,९९९ रुपये आहे. ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजच्या व्हेरिएंटची किंमत १०,९९९ रुपये आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Relame c53 launch in 6 gb ram 128 gb storage new vairent 108 mp camera check price tmb 01

First published on: 20-09-2023 at 16:18 IST
Next Story
iPhone 15 सिरीज आणि वॉच सिरीजमधील ‘या’ मॉडेल्सवर अ‍ॅपल देतेय डिस्काउंट; ऑफर्स एकदा बघाच