Realme या लोकप्रिय मोबाइल उत्पादक कंपनीने आपला नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. रिअलमीने आपल्या स्मार्टफोन सिरीजमध्ये Realme C53 हा फोन लॉन्च केला आहे. नवीन रिअलमी -सी सिरीजमध्ये १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर या फोनमध्ये वापरकर्त्यांना कोणकोणते फीचर्स मिळणार आहेत आणि याची किंमत किती असेल ते जाणून घेऊयात.

Realme C53 : स्पेसिफिकेशन्स

रिअलमीच्या हा नवीन स्मार्टफोन ड्युअल सिम (नॅनो), अँड्रॉइड १३ आधारित Realme UI T वर चालतो. यामध्ये ६.७४ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट हा ९० Hz इतका आहे. हा फोन १.८२ GHz पीक फ्रिक्वेन्सीसह ऑक्टा कोअर १२ nm चिपसेटद्वारे समर्थित आहे. तसेच यात ६ जीबी पर्यंत LPDDR4X रॅम आणि ARM Mali-G57 GPU सह जोडण्यात आले आहे. यामध्ये १२ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. याबाबतचे वृत्त gadgets360 ने दिले आहे.

Amazon Great Summer Sale Start On May Second hundreds of deals across various product categories
अर्ध्या किंमतीत स्मार्टफोन, स्मार्टवॉच, आयपॅड, खरेदी करण्याची संधी; कधी सुरु होणार सेल ? जाणून घ्या
Horizon investment of thousand crores in Chakan
होरायझनची चाकणमध्ये हजार कोटींची गुंतवणूक
Samsung launched on Friday a new variant of its popular budget F15 smartphone Here is all the details
२० हजारांपेक्षा कमी किमतीत सॅमसंगचा ट्रिपल कॅमेरा सेटअपचा स्मार्टफोन; बॅटरी लाईफ बघून म्हणाल ‘डील Done’
India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर

हेही वाचा : WhatsApp ने आणले मोठे अपडेट; आता नंबर सेव्ह न करताच अनोळखी व्यक्तीशी करता येणार चॅट

Realme C53 मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये १०८ मेगापिक्सल AI समर्थित प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. १०८ मेगापिक्सलचा सेन्सर मिळवणारा हा सेगमेंटचा पहिला हँडसेट असल्याचा दावा केला जात आहे. ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळणार आहे. तसेच यात १२८ जीबी स्टोरेजचा पर्याय मिळतो. जे मायक्रोएसडी कार्डद्वारे २ टीबी पर्यंत वाढवता येते.

Realme C53 मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 4G, GPS/AGPS, Wi-Fi, Bluetooth 5, 3.5mm हेडफोन जॅक आणि USB Type-C पोर्ट यांचा समावेश आहे. ऑनबोर्ड सेन्सरमध्ये accelerometer, मॅग्नेटिक सेन्सर, गायरो मीटर सेन्सर आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर यांचा समावेश आहे.

हेही वाचा : गुगलचा जास्तीत जास्त फायदा कसा घ्यायचा? जाणून घ्या ८ Googling Tips, ज्या ९९ टक्के लोकांना माहितच नाही

Realme C53 : किंमत आणि उपलब्धता

Realme C53 च्या ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ९,९९९ रुपये आहे. ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजच्या व्हेरिएंटची किंमत १०,९९९ रुपये आहे. हे टॉप मॉडेल आहे. हा फोन चॅम्पियन गोल्डन आणि चॅम्पियन ब्लॅक या दोन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. Realme.com आणि Flipkart या वेबसाईटवर २६ जुलै पासून हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.