रिलायन्स जिओ प्लॅनमध्ये १०९५ GB पर्यंत डेटा; अनलिमिटेड कॉल, किंमत फक्त ४१९ रुपयांपासून सुरू | reliance jio 3gb daily data plan prepaid plan offering unlimited call free diney plus hotstar 419 rupees to 4199 rupees prp 93 | Loksatta

रिलायन्स जिओ प्लॅनमध्ये १०९५ GB पर्यंत डेटा; अनलिमिटेड कॉल, किंमत फक्त ४१९ रुपयांपासून सुरू

तुम्ही देखील अशा मोबाईल युजर्सपैकी एक असाल ज्यांचा दररोज जास्त डेटा वापर होत असेल, तर Jio चे हे रिचार्ज पॅक तुमच्यासाठी आहेत.

रिलायन्स जिओ प्लॅनमध्ये १०९५ GB पर्यंत डेटा; अनलिमिटेड कॉल, किंमत फक्त ४१९ रुपयांपासून सुरू

रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी अशा एकूण ४ प्रीपेड प्लॅन ऑफर करते, ज्यामध्ये दररोज ३ GB हाय-स्पीड डेटा उपलब्ध आहे. जर तुम्ही देखील अशा मोबाईल युजर्सपैकी एक असाल ज्यांचा दररोज जास्त डेटा वापर होत असेल, तर Jio चे हे रिचार्ज पॅक तुमच्यासाठी आहेत. कंपनीच्या ३ GB डेटा प्रतिदिन प्लॅनची ​​किंमत ४१९ रुपयांपासून सुरू होते. याशिवाय जिओचे ६०१ रुपये, ११९९ रुपये आणि ४१९९ रुपयांचे प्रीपेड प्लॅन आहेत. जाणून घ्या जिओच्या या प्लॅन्सबद्दल सविस्तर माहिती…

रिलायन्स जिओचा ४१९९ रुपयांचा प्लॅन
रिलायन्स जिओच्या ४१९९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज ३ जीबी डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण १०९५ GB डेटा ऑफर करण्यात आला आहे. दररोज प्राप्त होणारा डेटा संपल्यानंतर, वेग ६४ Kbps पर्यंत घसरतो. प्लॅनमध्ये दररोज अनलिमिटेड कॉल आणि १०० एसएमएस उपलब्ध आहेत.

Jio च्या या प्रीपेड प्लॅनमध्ये Disney + Hotstar, JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud अॅप्सचे सबस्क्रिप्शन मोफत उपलब्ध आहे. डिस्ने + हॉटस्टार प्रीमियम सब्सक्रिप्शन एका वर्षासाठी प्लॅनमध्ये विनामूल्य उपलब्ध आहे.

आणखी वाचा : डिस्प्लेमध्ये कॅमेरा असलेले Red Magic 7S आणि Red Magic 7S Pro आले भेटीला, किंमत जाणून घ्या

रिलायन्स जिओचा ११९९ रुपयांचा जिओ प्लॅन
रिलायन्स जिओच्या १,१९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 3 जीबी डेटा दिला जातो. प्लॅनमध्ये एकूण २५२ GB हाय-स्पीड डेटा उपलब्ध असेल. दररोज प्राप्त होणारा डेटा संपल्यानंतर, वेग ६४ Kbps पर्यंत घसरतो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड STD, लोकल आणि रोमिंग कॉल मोफत उपलब्ध आहेत. जिओच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज १०० एसएमएस मिळतात.
याशिवाय Jio च्या या प्लानमध्ये Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud चे सबस्क्रिप्शन देखील मोफत दिले जाते.

रिलायन्स जिओचा ६०१ रुपयांचा जिओ रिचार्ज प्लॅन
रिलायन्स जिओच्या ६०१ रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता २८ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये दररोज ३ जीबी डेटा व्यतिरिक्त ६ जीबी अतिरिक्त डेटा उपलब्ध आहे. म्हणजेच ग्राहक एकूण ९० GB हाय-स्पीड डेटाचा लाभ घेऊ शकतात. जिओचा हा प्रीपेड प्लान अमर्यादित लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल ऑफर करतो. जिओच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस मिळतात.

आणखी वाचा : तुमच्या Aadhaar वर किती फोन नंबर नोंदणीकृत आहेत? या पद्धतीने जाणून घ्या

Jio च्या या प्लॅनमध्ये Disney + Hotstar, JioTV, JioCinema, Jio Security, JioCloud चे सबस्क्रिप्शन मोफत उपलब्ध आहे. डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शन प्लॅनमध्ये १ वर्षासाठी मोफत आहे.

रिलायन्स जिओचा ४१९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन
रिलायन्स जिओच्या ४१९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची ​​वैधता २८ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये दररोज ३ जीबी डेटा दिला जातो. म्हणजेच प्लॅनमध्ये एकूण ८४ जीबी डेटा उपलब्ध आहे. या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज अनलिमिटेड कॉल्स आणि १०० एसएमएस उपलब्ध आहेत.
प्लॅनमध्ये JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे मोफत सबस्क्रिप्शन देखील दिले जाते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-07-2022 at 21:35 IST
Next Story
डिस्प्लेमध्ये कॅमेरा असलेले Red Magic 7S आणि Red Magic 7S Pro आले भेटीला, किंमत जाणून घ्या