sources said jio will launch laptop worth 15 thousand | Loksatta

रिलायन्स जिओ ग्राहकांसाठी आणणार बजेट लॅपटॉप, इतकी असणार किंमत

एक आनंदाची बातमी समोर आली आहे. रिलायन्स जिओ ग्राहकांसाठी एक स्वस्त लॅपटॉप आणणार आहे. या लॅपटॉपची किंमत १५ हजार असणार आहे, अशी माहिती दोन सुत्रांनी रॉयटर्सला दिली आहे.

रिलायन्स जिओ ग्राहकांसाठी आणणार बजेट लॅपटॉप, इतकी असणार किंमत
प्रतिकात्मक छायाचित्र (pic credit – pixabay)

ऑफिसचे काम असो किंवा मनोरंजन यासाठी लॅपटॉपचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्याला कुठेही नेता येत असल्याने त्यावरून काम करणे सोयीचे ठरते. मात्र त्यातील प्रगत तंत्रज्ञानामुळे त्याची किंमत अधिक असते. त्यामुळे अनेकांना तो परवडत नाही. मात्र, एक आनंदाची बातमी समोर आली आहे. रिलायन्स जिओ ग्राहकांसाठी एक स्वस्त लॅपटॉप आणणार आहे. या लॅपटॉपची किंमत १५ हजार असणार आहे, अशी माहिती दोन सुत्रांनी रॉयटर्सला दिली आहे.

रिलायन्स जिओ लवकरच एक स्वस्त ४ जी लॅपटॉप भारतात लाँच करेल. या लॅपटॉपची किंमत १५ हजार रुपयांपेक्षा कमी असेल आणि त्यात ४ जी सीम असेल. कंपनी स्वस्त जिओ फोनच्या धर्तीवर हा लॅपटॉप ग्राहकांसाठी उपलब्ध करणार आहे. या लॅपटॉपचे नाव जिओ बूक असेल.

(५ जीचाही वेग ओलांडणार ‘ही’ कंपनी, १०० जीबीपीएस ब्रॉडबँड स्पीड देण्याची योजना)

लॅपटॉप बनवण्यासाठी रिलायन्स जिओने क्वालकॉम आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या मोठ्या कंपन्यांशी भागिदारी केली आहे. क्वालकॉम कंपनी जिओच्या लॅपटॉपसाठी आर्म लिमिटेडच्या तंत्रज्ञानाने निर्मित चिपसेट देणार आहे, तर लॅपटॉपमधील काही अ‍ॅप्स हे मायक्रोसॉफ्टच्या सहाय्याने चालतील.

आधी शाळांना मिळणार लॅपटॉप

रिलायन्स जिओचे भारतात ४२ कोटींपेक्षा अधिक ग्राहक आहेत. मात्र त्यांनी या लॅपटॉपबद्दल कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. लॅपटॉप आधी शाळा आणि सरकारी संस्थांसाठी उपलब्ध केला जाणार आहे. त्यानंतर इतरांसाठी हा लॅपटॉप उपलब्ध होणार आहे, अशी सुत्रांची माहिती आहे.

(5G in iphone : तुमच्या आयफोनमध्ये ५ जी आहे का? अ‍ॅपल यूजरना कोणत्या शहरात ५ जी सेवा मिळणार? जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरे)

जिओ ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणार लॅपटॉप

जिओबूकचे उत्पादन भारतातच फ्लेक्स कंपनीद्वारे होणार आहे. तसेच हा लॅपटॉप जिओच्या स्वत:च्या जिओ ओएस या ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणार आहे. जिओ स्टोअरवरून या लॉपटॉपसाठी अ‍ॅप्स डाऊनलोड करता येणार आहे. जिओ कार्पोरेट कर्मचाऱ्यांसाठी टॅबलेटचा पर्याय म्हणून हा लॅपटॉप उपलब्ध करणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Instagram ने लाँच केला हटके फीचर, काय आहे खास जाणून घ्या एका क्लिकवर…

संबंधित बातम्या

विश्लेषण: ६ दिवसात १० लाख युजर्स, एलॉन मस्कने केलं कौतुक, गुगलपेक्षा अचूक उत्तर देणारं ChatGPT कसं करतं काम?
घाई कराल तर आकर्षक फोन्सना मुकाल, डिसेंबरमध्ये लाँच होणार ‘हे’ दमदार फोन; १०८ एमपी कॅमेरा आणि बरेच काही
YOUTUBE TOP 10 यादी जाहीर, 2022 मध्ये ‘या’ व्हिडिओजना सर्वाधिक पसंती, कोणी पटकवले पहिले स्थान? पाहा
विश्लेषण: सायबर फसवणुकीतील रक्कम कशी वाचवावी? ‘गोल्डन अवर’ का महत्त्वाचा?
केवळ ३० मिनिटांत चार्ज होतो ONEPLUS चा ‘हा’ फोन, अमेझॉनवर मिळत आहे ६ हजारांची सूट, जाणून घ्या ऑफर

व्हिडिओ

ताज्या बातम्या
जे पोटात होतं ते ओठावर आलं; अजित पवारांच्या मनातले मुख्यमंत्री अजूनही उद्धव ठाकरेच, भर पत्रकार परिषदेत घडला किस्सा
राज्यपालांविरोधात पुण्याच्या माजी महापौरांचे राजभवनापुढे धरणे आंदोलन
“त्यांचे नाव राहुल गांधी नव्हे तर ‘राहुल गंदगी’ हवे”, भाजपाच्या खासदार पूनम महाजन यांचे टीकास्र
अण्णा नाईक पुन्हा एकदा झळकणार खलनायकाच्या भूमिकेत; पोस्टर आले समोर
“तिच्याजागी मी असतो तर…” रुचिराने इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो करण्याबद्दल रोहित शिंदे स्पष्टच बोलला