Elon Musk यांनी गेल्यावर्षी Twitter खरेदी केले होते. त्यानंतर ते ट्विटरमध्ये अनेक बदल करण्याचा प्रयत्न करत आहेत. मस्क हे चर्चेमध्ये राहण्यासाठी कायमच काहीतरी गोष्टी करत असतात. आतासुद्धा त्यांनी असेच काहीतरी केले आहे की, ज्यामुळे ट्विटरच्या युजर्सकडून त्याच्यावर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. तर नक्की मस्क यांनी असे काय केले आहे हे जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एलॉन मस्क यांनी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरवर एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, जो कोणी जर्नलिस्ट ट्विटरच्या प्रेस डिपार्टमेंटला ईमेल करेल त्याला ऑटो रिप्लायमध्ये एकच poop इमोजी मिळणार आहे. अब्जाधीश मस्क यांनी ट्विटर प्रेसची ऑटोमॅटिक रिप्लाय सिस्टीम बदलली आहे. हे अपडेट पाहून वापरकर्ते यावर मोठ्या प्रमाणात कंमेंट करत आहेत. याबाबतचे वृत्त NDTV ने दिले आहे.

हेही वाचा : Twitter यूजर्ससाठी मोठा धक्का! आजपासून बंद होणार ‘हे’ जबरदस्त सिक्युरिटी फिचर

ट्विटरने सुरु केलेली ऑटो रिप्लायची सिटीम पाहून मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात कंमेंट्सचा पूर आला आहे. यामध्ये असे अनेक वापरकर्ते आहेत त्यांनी स्वतः काय रिप्लाय येतो हे तपासण्यासाठी ट्विटर प्रेसला ईमेल केले. त्यानंतर वापरकर्ते ऑटो रिप्लायचे स्क्रीनशॉट्स काढून ट्विटरवर शेअर करत आहेत.

एका वापरकर्त्याने ट्विटरवर लिहिले की मी नुकतेच ट्विटर प्रेसला ईमेल केले आणि सब्जेक्ट लाईनमध्ये मला एक ईमोजी असेलला मेसेज आला. मार्केटिंग क्षेत्रातील ज्ञांना हे लिहायला बरीच वर्षे लागतील. त्याच वेळी एका वापरकर्त्याने गंमतीमध्ये लिहिले की, पीक परफॉर्मन्स असा दिसतो. म्हणजेच ट्विटरने केलेली ऑटोमॅटिक रिप्लाय सिस्टीम तपासण्यासाठी व खरोखरच असा रिप्लाय येतो का पाहण्यासाठी वापरकर्ते ट्विटर प्रेसला ईमेल करत आहेत.

हेही वाचा : WhatsApp चे नवीन फिचर! आता फोटोवरील मजकूर क्षणात करता येणार कॉपी, कसं ते जाणून घ्या

एलॉन मस्क यांनी गेल्यावर्षी ट्विटरची खरेदी केली होती. त्यांनी फ्री स्पीचला प्रोत्साहन देण्याचे वचन देत मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म विकत घेतला. तेव्हापासून त्यांनी पत्रकारांना मुक्त भाषणात लिहिण्यासाठी परवानगी दिली. यामध्ये स्वतंत्र पत्रकार मॅट टॅबी यांचा समावेश आहे, ज्याने ट्विटर फाइल्स सिरीज जाहीर करून एकच खळबळ उडवून दिली आहे.

मात्र ट्विटर खरेदी केल्यांनतर मस्क यांनी संपूर्ण कम्युनिकेशन विभागाला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तेव्हापासून कंपनीने कर्मचारी कपातीवर क्वचितच उत्तर दिले आहे. मस्क हे ट्विटरची किंमत कमी करण्यासाठी काम करत आहेत. तसेच कंपनीला भाडे आणि बिले न भरल्याच्या अनेक प्रकारणांचाही सामना करावा लागत आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twitter ceo elon muks set automatic poop emoji press enquiries users many comments know the deatils tmb 01
First published on: 20-03-2023 at 14:41 IST