User asked musk to increase character limit : मस्क यांनी ट्विटरची धुरा संभाळल्यानंतर कंपनीमध्ये अनेक फेरबदल झाले आहेत. नवीन ब्ल्यू टीक सेवा लाँच करण्यात आली. ट्विटरला अजून काही नवीन फीचर मिळण्याची शक्यता आहे. अक्षर मर्यादा वाढवण्याबाबत चर्चा सुरू होती. आता एका ट्विटर युजरने मस्क यांना अक्षर मर्यादा वाढवण्याबाबत नवीन पर्याय सूचवला आहे. यावर मस्क यांनी काय प्रतिक्रिया दिली? याबाबत जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्पेसफ्लाइट फोटोग्राफर जॉन क्राऊस यांनी ट्विटरची अक्षर मर्यादा १ हजार पर्यंत वाढवली पाहिजे, असे मस्क यांना टॅग करत ट्विट केले आहे. त्यावर मस्क यांना अक्षर मर्यादा वाढवण्यावर काम सुरू असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. अक्षर मर्यादा ही १ हजार असायला हवी, परंतु टाइमलाईनवर केवळ २८० अक्षर मर्यादेतील मजकूर दाखवा आणि पुढे … (show more) असे ट्विट आणखी मोठे आहे, हे दर्शवण्यासाठी द्या. टॅप केल्यावर संपूर्ण ट्विट वाढवा, असा पर्याय जॉन यांनी इलॉन मस्क यांना सूचवला, त्यावर काम सुरू असल्याचे इलॉन मस्क यांनी म्हटले आहे.

(मस्तच! आता व्हॉट्सअ‍ॅपमध्ये स्वत:लाच पाठवता येईल मेसेज, तयार करता येईल नोट्स, ‘असे’ वापरा नवीन फीचर)

मस्क यांनी ट्विटरची मालकी मिळवल्यानंतर अनेक बदल करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्या निर्णयांमुळे कंपनीत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. कंपनी घाट्यात असल्याचे सांगून जवळपास ५० टक्के कर्माचाऱ्यांना नोकरीवरून काढण्यात आले. मात्र, रविवारी मस्क यांनी ट्विटर कंपनी टॉल्कच्या काही स्लाइड्स शेअर करत कंपनी नोकर भरती करत असल्याचे सांगितले.

दुसऱ्या स्लाइड्स द्वेषयुक्त भाषणाचे प्रमाण कमी झाल्याचे आणि साइनअपची संख्या वाढल्याचे दाखवतात. त्याचबरोबर युजर अ‍ॅक्टिव्ह मिनीट वाढल्याचे या स्लाइड्समधून दाखवण्यात आले आहे. एकंदरीत कंपनीत सर्व काही ठीक असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न यातून झाल्याचे दिसून येते. इलॉन मस्क यांच्या राज्यात ट्विटरची वृद्धी होईल की, तिची अधोगती होईल हे आता काळच सांगेल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twitter user asked musk to increase character limit on twitter musk said its on the todo list ssb
First published on: 28-11-2022 at 18:23 IST