कॅश काढण्यासाठी एटीएममध्ये गेले असता कार्ड घरीच विसरल्याची घटना तुमच्यासोबत घडली असेल. मात्र, पुढे असे झाले तर चिंता करायची गरज नाही. तुम्ही युपीआयद्वारे (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) एटीएममधून कॅश काढू शकता. यूपीआयमुळे आधीच डेबिट कार्ड, क्रेडिटकार्डशिवाय सहजरित्या ऑनलाइन व्यवहार करणे शक्य झाले आहे. आता डेबिट कार्डशिवाय एटीएममधून पैसे मिळवण्याची सुविधा यूपीआय देत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे निर्मित यूपीआय युजरला यूपीआयचा वापर करून एटीएममधून कॅश काढण्याची सोय देते. या फीचरला इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विड्रॉवल (आयसीसीडब्ल्यू) असे म्हणतात. या फीचरद्वारे लोकांना कार्ड नसतानाही एटीएममधून पैसे काढता येतात.

रिझर्व्ह बँकेने देखील बँकांना एटीएमसाठी आयसीसीडब्ल्यूचा पर्याय देण्याचा सल्ला दिला आहे. कार्डद्वारे फसवणूक, उपकरणाशी छेडछाड या गोष्टी टाळण्यासाठी हा सल्ला देण्यात आला आहे. ही सेवा स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, एचडीएफसी आणि इतर बँकांच्या एटीएमवर उपलब्ध आहे. यूपीआयद्वारे कॅश काढण्यासाठी तुम्ही गुगल पे, पेटीएम, फोनपे किंवा कुठल्याही यूपीआय सेवा पुरवणाऱ्या अ‍ॅप्सचा वापर करू शकता.

यूपीआयद्वारे एटीएममधून कॅश काढण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा

  • कोणत्याही एटीएम मशीनवर जा आणि स्क्रिनवरील ‘विड्रॉ कॅश’ या पर्यायाला सिलेक्ट करा.
  • यूपीआय पर्याय निवडा.
  • एटीएम स्क्रिनवर क्युआर कोड दिसून येईल.
  • आता फोनमध्ये यूपीआय अ‍ॅप उघडा आणि एटीएम मशीनवर दाखवण्यात येत असलेला क्युआर कोड स्कॅन करा.
  • आता तुम्हाला काढायचे असलेले पैसे टाका. तुम्ही ५ हजार रुपयांपर्यंत कॅश मिळवू शकता.
  • आता यूपीआय पीन टाका आणि ‘हीट प्रोसिड’ बटनवर क्लिक करा.
  • तुम्हाला एटीएम मशीनमधून कॅश मिळेल.
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Withdraw cash from atm machine using mobile ssb