आपल्या देशात सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेवर अवलंबून असलेले लाखो लोक आहेत. पण लोकसंख्येचा आकडा पाहता पुरेशी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्याप उपलब्ध नाही. रेल्वे असो किंवा बस प्रवाशांना धक्के सहन करत प्रवास करावा लागतो. रेल्वे आणि बसची तुलना केली असता तिकिटाच्या बाबातीत रेल्वेची सुविधा खूप चांगली आहे पण बसमध्ये अजूनही रोज सुट्ट्या पैशांवरून कंडक्टरबरोबर प्रवाशांना वाद घालावा लागतो. सोशल मीडियावर कंडक्टर आणि प्रवासाच्या वादाचे अनेक व्हिडीओ चर्चेत येत असतात. सध्या अशाच एका भांडणाची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. एका कंडक्टरने ५ रुपये दिले नाही असा दावा करणाऱ्या प्रवाशाने सोशल मीडियावर तिकीटाचा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊ या.

बसने प्रवास करणाऱ्या लोकांना अनेकदा अशा समस्यांना सामोरे जावे लागते. अनेकदा सुट्टे पैसे प्रवाशांकडे नसतात. बऱ्याचदा प्रवाशांना उरलेले पैसे मागूनही परत मिळत नाही किंवा कधी कधी गर्दीत कंडक्टरही ते परत द्यायला विसरतो, पण अलीकडेच या समस्येने त्रस्त झालेल्या बंगळुरूच्या एका व्यक्तीने बस कंडक्टरला चांगलाच धडा शिकवला आहे. जेव्हा कंडक्टरने ५ रुपये देण्यास नकार दिला तेव्हा त्याने BMTCला टॅग करत ५ रुपये मागितले आहे.

हेही वाचा- भांडी घासावी लागू नये व्यक्तीने शोधला भन्नाट जुगाड! हर्ष गोयंकांनी शेअर केला मजेशीर व्हिडीओ

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @N_4_NITHIN त्याच्या खात्यावरून एक पोस्ट शेअर करत, माझे ५ रुपये बुडवले यावर काही उपाय आहे का? असे विचारले. त्याने त्याच्या १५ रुपयांच्या BMTC (बेंगळुरू मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन) बस तिकिटाचा फोटो देखील शेअर केला आहे. व्हायरल होत असलेल्या या पोस्टवर यूजर्सच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

हेही वाचा – न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral

त्यांने पुढे लिहिले की, ‘एकतर त्यांना (कंडक्टरला) ट्रिप सुरू करण्यापूर्वी पुरेसे सुट्टे पैसे जवळ ठेवावे किंवा ऑनलाइन पेमेंट तंत्रज्ञानाचा वापर केला जावा. माझे पैसे प्रत्येक वेळी असेच बुडवले जातील का? हे कारण देऊन कंडक्टर थोडे पैसे कमवत आहेत.”

एका सोशल मीडिया वापरकर्त्याने लिहिले की”सार्वजनिक वाहतूक कोणत्याही त्रासाशिवाय प्रवास करण्यासाठी, तुम्हाला फक्त तिकीटाची योग्य किंमत ठेवा जेणेकरून प्रवाशांना किंवा कंडक्टरला कोणतीही अडचण येणार नाही.” दुसऱ्या युजरने लिहिले, “UPI द्वारे पैसे द्या.” यावर नितीन म्हणाले की,”नॉन एसी बसमध्ये सध्या ऑनलाइन पेमेंट करण्याची सुविधा नाही.”