Fact Check: अनेकदा सार्वजनिक ठिकाणी मौल्यवान सामान चोरी होईल याची भीती प्रत्येकालाच असते. कारण- अनेकदा चोरटे बाईक किंवा कारमधून येऊन सोन्याच्या मौल्यवान वस्तू किंवा पाकीट, पर्स हिसकावून नेतात. रस्त्याने पायी जात असलेल्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकवण्याच्या घटना सातत्याने होत असताना एक्स (ट्विटर)वरून १४ सेकंदांचा एक व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कारमधील काही तरुण रस्त्याने चालत असलेल्या महिलेचे दागिने हिसकावून घेताना दिसत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये महिलेला रस्त्यावर लुटले जात असल्याचा दावा करीत हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. पण, तपासादरम्यान आम्हाला आढळून आले की, हा व्हिडीओ तमिळनाडूमधील गेल्या वर्षीच्या एका घटनेचा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका सोशल मीडियावर युजरने हा व्हायरल व्हिडीओ @ParoNdRoy या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच ‘जंगलराज उत्तर प्रदेश!! रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेची चेन हिसकावून पळ काढला. तडीपार आता कुठे आहेत? दागिने घातलेल्या स्त्रिया सुरक्षित आहेत, असे कोण म्हणायचे’, अशी कॅप्शन या पोस्टला देण्यात आली आहे.

‘इतर वापरकर्तेदेखील असाच दावा करीत हा व्हिडीओ शेअर करीत आहेत.

तपास:

आम्ही या व्हिडीओचा तपास सुरू केला. तेव्हा आम्हाला एनडीटीव्हीच्या वेबसाइटवर हा व्हिडीओ अपलोड केलेला पाहायला मिळाला.

व्हिडीओचे शीर्षक होते – Chain Snatchers Target Woman, She Narrowly Escapes Being Run Over

१७ मे २०२३ रोजी अपलोड केला गेलेला हा व्हिडीओ तमिळनाडूतील कोईम्बतूरमधील आहे. कारमधील दोघांनी रस्त्याच्या कडेला चालत असलेल्या महिलेची चेन हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. चालत्या गाडीत बसून ही चोरी करण्याचा प्रयत्न दोन तरुणांनी केला आहे. त्यांनी धावत्या गाडीतून महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावून, तिला काही अंतरापर्यंत खेचत नेले होते. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती.

आम्हाला इतर न्यूज वेबसाईट्सवरही या घटनेबद्दलची माहिती मिळाली.

राज न्यूज तमीळच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर एक वर्षापूर्वी हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता.

टाइम्स नाऊच्या एक्स हॅण्डलवरही हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता.

निष्कर्ष : तमिळनाडूमधील कोईम्बतूरमधील सोनसाखळ्या हिसकावण्याच्या घटनेचा जुना व्हिडीओ उत्तर प्रदेशातील अलीकडील घटनेचा सांगून व्हायरल झाला आहे. व्हायरल केलेले दावे खोटे व दिशाभूल करणारे आहेत, अशी माहिती या तपासातून समोर आली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fact check tamil nadu coimbatore woman almost run over by car in chain snatching attempt was captured on cctv footage asp