नवरीसमोरच केलं असं काही की खवळला नवरदेव; स्टेजवरच सुरू झाली मारामारी, पाहा VIRAL VIDEO

man pulled grooms cheeks viral video : हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही हे मात्र नक्की. स्टेजवर नवरीसोबत खुर्चीवर बसलेल्या नवरदेवासोबत नातेवाईकाने असं काही केलं की….

groom-angry-viral-video
(Photo: Instagram/ official_viralclips)

लग्नात अनेकदा आपण पाहिलं असेल की जेव्हा स्टेजवर लग्नात आलेले पाहूणे मंडळी नवरा नवरीला भेटायला जातात तेव्हा प्रेमाने अनेकजण नवरा नवरीचे गाल ओढतात. काही जण त्यांची टिंगलही करतात. अनेक नवरी नवरदेव गमतीची गोष्ट म्हणून त्या गोष्टीचा आनंदही घेतात. पण हे प्रत्येक वेळी घडेलच असं नाही. काही नवरा नवरी असेही असतात की लग्नात त्यांच्यासोबत केलेली थट्टा मस्करी त्यांच्या पचनी पडत नाही आणि मग पुढे जे घडतं ते तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही. असाच किस्सा घडल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही हे मात्र नक्की.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की नवरी आणि नवरदेव स्टेजवर बसलेले आहेत. इतक्यात त्यांच्या नात्यातील कोणीतरी स्टेजवर येतं आणि नवरी नवरदेवाबरोबर फोटो काढण्यासाठी मागे उभा राहतो. इतक्यात त्या नातेवाईकाच्या काय मनात आलं आणि पुढे खुर्चीवर बसलेल्या नवरदेवाचे गाल त्याने ओढले. आपले गाल ओढलेले नवरदेवाला काही आवडलं नाही आणि तो भर स्टेजवर खवळला. रागाच्या घरात तो त्याच्या जागेवरून उठतो आणि त्या व्यक्तीला मारायला लागतो. ही लढाई काही हलकी-फुलकी नव्हती. नवरदेवाने त्या व्यक्तीचे गाल लाल होईपर्यंत त्याला मारलेलं दिसून येतंय. दरम्यान, वधूने दोघांना वेगळे करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिचे प्रयत्नही व्यर्थ गेले.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : घराच्या छतावर लपून डान्स व्हिडीओ बनवत होती, अचानक झालं असं काही की…

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : केअरटेकरला वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने धावला हत्ती, हा VIRAL VIDEO पाहून भावूक व्हाल

हा व्हिडीओ बघायला खूप मजेशीर आहे. इन्स्टाग्रामवर official_viralclips नावाच्या पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ बघता बघता इतका व्हायरल झाला की आतापर्यंत त्याला १ लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडओवर लोक वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिलं की, “अगदी बरोबर केलं”. दुसर्‍याने लिहिले की, “अशा लोकांच्या बाबतीत असंच असावं.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Groom get angry on the stage after man pulled his cheeks then what happened next in funny viral video prp

Next Story
आजीला चॅलेंज करायला निघाला नातू; फक्त २ मिनिटात उतरवलं भूत, पाहा VIRAL VIDEO
फोटो गॅलरी