Propose Day 2025 Quotes Messages : सध्या ‘व्हॅलेंटाईन वीक’ उत्साहाने साजरा केला जात आहे. प्रेमाच्या आठवड्याचा दुसरा दिवस म्हणजे ‘प्रपोज डे. या दिवशी व्यक्ती आपल्या प्रिय व्यक्तीसमोर मनातील भावना किंवा प्रेम व्यक्त करतो. हटक्या पद्धतीने प्रपोज करत प्रपोज डे च्या शुभेच्छा देतो. आज आपण प्रपोज डेनिमित्त रोमँटिक शुभेच्छा संदेश जाणून घेणार आहोत. हे शुभेच्छा संदेश तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला पाठवू शकता. (Happy Propose Day 2025 WhatsApp Wishes, Greetings, Messages, Images To Share With Your Loved Ones in Marathi)

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समुद्राचं किनाऱ्याशी…
ढगांचं आभाळाशी…
मातीचे जमिनीशी..
तसंच अतुट नाते आहे…
माझे केवळ तुझ्याशीच…
हॅप्पी प्रपोज डे !

(Photo : freepik)

महागडे गिफ्ट नको मला
तुझा भरपूर वेळ दे फक्त आणि फक्त मलाच
होकार असेल तर
तुझा हात दे माझ्या हातात
हॅप्पी प्रपोज डे !

ना मला तुला गमवायचं आहे,
ना तुझ्या आठवणीत रडत बसायचंय,
देशील का मला कायम साथ?
राणी, सांग ना मला तुझ्या मनातील बात
हॅप्पी प्रपोज डे !

(Photo : freepik)

नाही आजपर्यंत बोलता आले,
आज ते सारे तुला सांगणार आहे…
नाही मी जगू शकत तुझ्याशिवाय,
इतकंच तुला सांगणार आहे…
हॅप्पी प्रपोज डे !

चंद्रास साथ जशी चांदण्यांची
तशी साथ तू मला देशील का?
जीवनाच्या या सुंदर प्रवासात
तुझा हात हाती देशील का?
हॅप्पी प्रपोज डे !

(Photo : freepik)

शेवटच्या श्वासापर्यंत तुला सांथ देईन,
दुःखाच्या वादळातही नेहमी तुझ्या सोबतच राहीन,
माहित नाही असा क्षण परत केव्हा येईल,
आज आयुष्य भर तुझ्या उत्तराची वाट मी पाहीन !
हॅप्पी प्रपोज डे !

हेही वाचा

होकार द्यायचा कि नकार हे तू ठरव,
बाकी प्रेम तर मी तुझ्यावर शेवटच्या श्वासापर्यंत करेन…
हॅप्पी प्रपोज डे !

(Photo : freepik)

सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला
रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला
हॅप्पी प्रपोज डे !

बंध जुळले असता मनाच नातही जुळायला हवं अगदी स्पर्शातून ही सार कळायला हवं
हॅप्पी प्रपोज डे !

(Photo : freepik)

स्वर्ग हा नवा,
वाटतो हवा..
साथ ही तुझी जणू,
उन्हात चांदवा
स्वर्ग हा नवा,
वाटतो हवा..
ऐक साजणी,
ह्या खुळ्या क्षणी
वेड लावतो जीवा,
तुझाच गोडवा..
हॅप्पी प्रपोज डे !

स्वप्न आहेस माझे तू,
सत्यात कधी उतरशील.
जितकं प्रेम तुझ्यावर करते मी,
तितकं प्रेम माझ्यावर कधी करशील?
हॅप्पी प्रपोज डे !

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Happy propose day 2025 wishes status for whatsapp greetings images romantic messages in marathi share with your loved ones in valentines week ndj