Video: मजुराने केलेला डान्स सोशल मीडियावर व्हायरल; नेटकरी म्हणाले “हा तर मायकल जॅक्सन”

सोशल मीडिया हे माध्यम इतकं वेगवान झालं आहे की, एखादी व्यक्ती रातोरात प्रसिद्धीच्या झोतात येते.

Labour_Dance
Video: मजुराने केलेला डान्स सोशल मीडियावर व्हायरल; नेटकरी म्हणाले "हा तर मायकल जॅक्सन" (Photo- Viral Video Grab)

सोशल मीडिया हे माध्यम इतकं वेगवान झालं आहे की, एखादी व्यक्ती रातोरात प्रसिद्धीच्या झोतात येते. लोकांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना सोशल मीडियामुळे नवा प्लॅटफॉर्म मिळाला आहे. काही इतके जबरदस्त असतात की, असे व्हिडीओ वारंवार पाहण्याचा मोह आवरत नाही. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये बांधकामाच्या ठिकाणी असलेला एक मजूर जबरदस्त डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. या व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून लोकांची पसंती मिळत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की काही लोक बांधकामाच्या ठिकाणी बसले आहेत. तिथे एक व्यक्ती अचानक उठून नाचू लागते. त्याच्या डान्स स्टेप्स पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तो कुठून हा डान्स शिकला असेल असे वाटत नाही. त्याचा अप्रतिम डान्स पाहून तिथे बसलेले लोकही टाळ्या वाजवत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी या व्यक्तीची तुलना मायकल जॅक्सनशी करत आहेत.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ आयएएस अधिकारी डॉ. एमव्ही राव यांनी शेअर केला आहे. व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरु आहे. तसेच नेटकरी हा व्हिडीओ वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Labour dance steps viral on social media rmt

Next Story
VIRAL VIDEO : सापाचे लागोपाठ वार आणि उंदराची अगदी ‘ब्रूस ली’ सारखी फाईट, पाहा कोणी मारली बाजी…
फोटो गॅलरी