आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षीच तिचं लग्न ठरलं आणि पुढचं शिक्षण घेण्याची इच्छा असताना देखील शिक्षण घेता आले नाही. मात्र शिक्षणाची आवड लक्षात घेता तब्बल लग्नाला १७ वर्ष पूर्ण झाल्यानंतर सरस्वती मंदिर रात्र शाळेमध्ये प्रवेश ही परीक्षा देण्याच ठरविले. त्यांच्या या जिद्दीला यश आले असून तब्बल ७२ टक्के मिळवत त्यांनी पहिला क्रमांक मिळवला आहे. त्यांचे नाव आहे रेखा शिरसाट. कोणत्याही वयात शिक्षण घेतले तरीही जिद्दीच्या जोरावर तुम्ही चागंल्याप्रकारे यश मिळवू शकता हेच रेखा शिरसाट यांनी दाखवून दिले आहे.

त्यांच्या या यशामागचं गमक जाणून घेतले असता आपल्या या यशामध्ये पतीचा सिंहाचा वाटा असल्याचे त्या आवर्जून सांगतात. त्यांनी प्रोत्साहन दिले नसते तर मी दहावी इतक्या वर्षांच्या काळानंतर ही परीक्षा देऊ शकले नसते. त्यामुळे पतीचा पाठिंबा निश्चितच महत्त्वाचा आहे.

रेखा शिरसाट या पुण्यातील असून ९ वी पास होताच त्यांच लग्न झालं. त्यामुळे पुढे शिक्षण घेण्याची इच्छा त्यांची अपूर्ण राहीली. त्यांचे पती मार्केटिंगचे काम करतात, तर त्या स्वत: बुटिक चालवतात. त्यांना चार मुले असून तेही आता शिक्षण घेत आहेत. कौटुंबिक जबाबदाऱ्या, बुटीक सांभाळत त्यांनी आपला अभ्यास केला हे नवल. मुलांना शिक्षण घेताना पाहून आपल्याला शिकण्याची इच्छा झाल्याचे त्यांनी सांगितले.

घराच्यांकडे शिकण्याची इच्छा व्यक्ती केली तेव्हा सर्वांनी प्रोत्साहन दिले. त्यानंतर सरस्वती मंदिर रात्र शाळेमध्ये प्रवेश घेतला. या एक वर्षाच्या काळात अनेक अनुभव आले असून सोबतचे विद्यार्थी, शिक्षक आणि कुटुंबातील प्रत्येकाने या काळात मदत केली. आपल्या मुलांनीही आपल्याला या काळात खूप समजून घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्यात प्रामुख्याने मुलानी कारण ज्या वेळी मला घरी जायची तेव्हा स्वयंपाक बहुतेक वेळा त्यांनी केला आणि परीक्षा दरम्यान त्यांनी खूप मार्गदर्शन केल्याचे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra ssc result 2017 she pass 10th exam after 17 years of marriage