आई आणि तिच्या लेकरांचं नातं अगदी खास असतं. काळजाच्या तुकड्याप्रमाणे आपल्या लेकरांना जपणारी आई प्रत्यही अनेकदा संकटांना सामोरी जात असते. अगदी जन्म दिल्यापासून ते मूल मोठं होईपर्यंत आई आपल्या मुलांना सांभाळते, त्यांचं रक्षण करते. लहान-मोठ्या सगळ्या संकटांत ती आपल्या मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपल्या लेकराला कुठे खरचटलं तरी आईचा जीव वर-खाली होतो. अशा वेळेस जर आपलं लेकरू अचानक गाडीसमोर आलं, तर त्या आईचं काय होईल याचा विचार करा. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत आई आपल्या लेकीचा जीव वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात टाकते.

माय-लेकीबरोबर घडली दुर्घटना

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ सध्या जास्त चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये एक बस भरवेगात येते आणि रस्त्यावरून आपल्या चिमुकल्या लेकीसह जाणाऱ्या महिलेला त्या बसचा धक्का लागतो. धक्का लागताच ती ओलसर रस्त्यावर पडते. नशीबाने ती बससमोर येण्यापासून बचावते. तिच्याबरोबर तिची लहान लेकदेखील असते. तिची लेक पुशचेअरमध्ये बसलेली असते. आई रस्त्यावर पडल्यामुळे पुशचेअर हातातून सटकते आणि मुलगी चेअरसकट रस्त्यावर घसरते. वेगात येणाऱ्या बसला धडक लागण्यापासून त्या दोघीही वाचतात. बसचे टायर्स मुलीच्या अगदी डोक्याच्या जवळून जातात. यादरम्यान, दोघी आई आणि मुलगी घाबरल्या असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळतंय. दरम्यान, या अपघातात त्यांना कुठलीही दुखापत झाली नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @dailymail या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला तब्बल ७५.४ मिलियन व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “मी असतो तर बस ड्रायव्हरला तुरुंगात टाकलं असतं” तर दुसऱ्याने “बस ड्रायव्हरकडे डोळे नाहीत का” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “देवाचे आभार ते दोघेही ठीक आहेत. पण तो ड्रायव्हर त्यांना तपासण्यासाठी बसमधूनही उतरला नाही. त्याला तुरुंगात टाकाला हवं.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking video of accident mother daughter fell down due to overspeed bus viral video on social media dvr