फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झकेरबर्ग याने पुन्हा एकदा आपल्या पोस्टने जगभरातील फेसबुकच्या यूजर्सची मने जिंकली आहेत. यावेळी झकरबर्ग याने पॅटर्निटी लिव्हसंदर्भात पोस्ट केली आहे. त्याच्या या पोस्टला जगभरातून मोठी पसंती मिळत आहे. वेगवेगळ्या विषयात आपले मत नोंदवत झकरबर्ग आपल्या चाहत्यांची नेहमीच मने जिंकत असतो. त्याचप्रमाणे आणखी एका गोष्टीविषयी त्याने नुकतेच आपल्या पोस्टव्दारे मत नोंदवले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

झकरबर्ग काही दिवसांतच दुसऱ्या बाळाचे वडिल होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर त्याने हे विधान केले आहे. आपण पुन्हा एकदा पिता होणार असल्याची माहिती त्याने काही महिन्यांपूर्वी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन दिली होती. मॅक्स या माझ्या पहिल्या मुलीच्या वेळेस मी २ महिन्यांची पॅटर्निटी लिव्ह घेतली होती. आणि यावेळीही मी दोन महिन्यांची सुटी घेणार असल्याचे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. अशा आनंदाच्या क्षणी कुटुंबाबरोबर वेळ घालवणे अतिशय आवश्यक असल्याचे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

मॅक्सच्या जन्माच्या वेळी तिच्या आयुष्यातल्या पहिल्या महिन्यात मी तिच्यासोबत होतो आणि इतका वेळ मी तिला देऊ शकलो ही अतिशय आनंदाची बाब आहे. जेव्हा त्याला पहिली मुलगी झाली त्यावेळी वडिलांची मुलांच्या आयुष्यातील असणारी भूमिका किती महत्त्वाची आहे याबाबत त्याने अनेकदा वक्तव्य केले होते. पालकत्त्वाची सुटी किती महत्त्वाचे असते हे सांगताना तो म्हणतो, चार महिन्यांची मॅटर्निटी आणि पॅटर्निटी लिव्ह आवश्यक असते. कारण नोकरी करणाऱ्या पालकांना आपल्या नव्याने जगात आलेल्या बाळाला वेळ देता येतो. त्याने आपली मुलगी मॅक्स, प्रिसिला आणि कुत्रा बिस्ट याच्याबरोबरचा फोटोही नुकताच शेअर केला आहे. हा फोटो मोठ्या प्रमाणत व्हायरल होत असून २४ तासांहून कमी वेळात या फोटोला १६ हजारांहून अधिक शेअर्स मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two month paternity leave annoucement of mark zuckerburg winning hearts of facebook users