ट्रेनमधून घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर असा प्रवास कधी एकदा संपतो असे प्रवशांना होत असते. यात कधी कधी तर काहीजणांना जागेवरून होणारी भांडण पाहण्याव्यतिरिक्त दुसरे काही मनोरंजन नसतेच म्हणा. आता कल्पना करा अशाच रटाळ प्रवासात अचानक तुमच्या समोर सुटाबुटातले चांगले कपडे घालून एक दोन जण आले आणि तुमचे मनोरंजन केले तर ?
दिल्लीकरांच्या बाबतीही असेच झाले. मेट्रोतून घरी परतत असलेले अनेक जण आपापल्या विश्वात मग्न होते. काही जण मोबाईलमध्ये डोके खुपसून होते तर काही जण आपल्या विचारात मग्न अशा वेळी दोन तरूण मेट्रोच्या डब्यात शिरतात आणि जो धुमाकुळ घालतात त्यावरून मात्र कंटाळलेल्या प्रवाशांचा जणू प्रवास सुखकर होतो. मेट्रोमध्ये अगदी कशाचीच पर्वा न करता डान्स करून प्रवशांना हसवणा-या दोन तरूणांचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. दिल्ली मेट्रोमध्ये दोन मुलांनी दिल्ली विद्यापीठ ते विधानसभा या स्थानकादरम्यान डान्स केला. ब्रेक डान्स, नागिन डान्स, भांगडा डान्स अशा वेगळेगळया करामती या दोघांनी केल्या. मेट्रोत सगळेच प्रवाशी आपल्या विचारात गढून गेले होते त्यांना हसवण्यासाठी या दोघांनी अशा प्रकारे डान्स करून सगळ्यांचे मनोरंज केले. त्याचा हा व्हिडियो ट्रेनमधल्या एका प्रवाशाने काढला त्यानंतर त्याने तो फेसबुकर अपलोड केला आणि लाखो लोकांनी तो पाहिला देखील आहे. ट्रेनमध्ये अशा प्रकारे डान्स करण्याचे प्रकार बाहेरच्या देशात खूपच प्रसिद्ध आहे, पण भारतात मात्र असे प्रकार पाहायला मिळणे दुर्मिळच.
यातल्या डान्स करणा-या एकाचे नाव हर्ष असल्याचे समजते आहे. हर्ष हा फक्त वीस वर्षाचा तरुण आहे आणि तो अशा प्रकारे लोकांचे मनोरंजन करून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करतो. हर्ष ‘हंस ले’ इंडिया नावाचा व्हिडिओ चॅनल चालवतो. तो आणि त्याचा भाऊ मिळून लोकांचे मनोरंजन करण्यासाठी असे नवनवे प्रयोग करत असतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two student dance in delhi metro