मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयामुळे सुरूवातीला काही काळ सगळ्यांमध्ये संभ्रम आणि तणावाचे वातावरण होते. अचानक नोटा बाद केल्याने कसे काय होणार अशी चिंता प्रत्येकाच्या चेह-यावर साफ दिसत होती पण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या भरमसाठ विनोदांनी मात्र प्रत्येकाच्या काळजीवर फुंकर घातली आणि जो तो या विनोदांचा आनंद घेऊ लागला. या विनोदांमधला एक विनोद म्हणजे ‘सोनम गुप्ता बेवफा है’ असे लिहिलेली २ हजार रुपयांची नोट.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या काही महिन्यांपासून नेटीझन्सच्या विस्मरणात गेलेली ही सोनम गुप्ता २ हजारांच्या नोटेमुळे पुन्हा एकदा प्रसिद्धीस आली. प्रियकराला दगा दिलेल्या सोनमचा प्रियकर अजूनही शांत बसला नाही हे पाहून अनेकांनी डोक्यावर हात मारला आहे. त्या सोनमला अंदाजाही नसेल की आपल्या बेईमानीचे चर्चे अद्यापही सुरूच आहेत. खरे तर नव्या नोट्या आल्या तर त्यावर ‘कृपया करुन कोणी पेनाने लिहू नका’ असे संदेशही व्हॉट्स अॅपवर फिरत होते. कारण अशा नोटा मग बाद केल्या जातात त्यामुळे नोटांवर कोणतीही अक्षरे पेनाने लिहू नये अशी मोहिम संदेशाद्वारे राबवली जात आहे. असे असताना या नोटेमुळे अनेकांनी चीड व्यक्त केली आहे. अगदी १० रुपयांपासून ते २००० रुपयांपर्यंतच्या अनेक नोटांवर या सोनमच्या दग्याफटक्याचे दाखले दिले आहेत. आता तर इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या सोनम गुप्ताला ‘नॅशनल बेवफाच’ घोषीत करा असे विनोद रंगत आहेत तर कोण सोनम गुप्ताने केल्या प्रेमभंगामुळे नोटा खराब होत आहेत त्यामुळे तिला हुडकून काढून शिक्षा द्या असे विनोदही करत आहे. पण काही असले तरी अशा प्रकारे नव्या नोटांवर संदेश लिहून त्यांचे मूल्य कमी करू नका असेही आवाहन करण्यात येत आहे.

https://twitter.com/iuagarwal/status/798051425766883328

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: With new rs 2000 notes bewafa sonam resurfaces as the subject of hilarious memes online