अभियांत्रिकी व औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशाकरिता १६ मे रोजी एमटी-सीईटी २०१३ ही प्रवेश परीक्षा होणार असून, त्यासाठी माहिती पुस्तिका इच्छुकांना जेथे तो इयत्ता बारावी शिकत असेल वा शिकलेला असेल तेथूनच उपलब्ध करून देण्यात येतील. याशिवाय जे अर्जदार महाराष्ट्राबाहेर शिक्षण घेत आहेत किंवा उत्तीर्ण झालेले आहेत त्यांना नोटिफाइड कॉलेजमधून माहिती पुस्तिका उपलब्ध करून देण्यात येतील. नाशिक जिल्ह्यासाठी सामनगाव येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयास नोटिफाइड कॉलेज म्हणून घोषित करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील बारावी विज्ञान शाखा असलेल्या सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना तंत्रशिक्षण संचालनालयाने त्यांच्या शाळेतील या परीक्षेस बसणाऱ्या इच्छुकांची संख्या शासकीय तंत्रनिकेतनकडे कळविण्याची सूचना देण्यात आली आहे, परंतु अद्यापही अनेक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांची माहिती नोटिफाइड कॉलेजला दिलेली नाही. त्यामुळे सर्वानी ही माहिती त्वरित पाठवावी. नाशिक जिल्ह्याकरिता प्रा. आर. एन. वैद्य यांची नोटिफाइड कॉलेज ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
नाशिक जिल्ह्यातील बारावी विज्ञान शाखा असलेल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालये व शाळांनी त्यांच्याशी ९८९००३५८८९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एमटी-सीईटी परीक्षेचे  जिल्हा   अधिकारी    पी.  जी.   कोचुरे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government polytechnic notified collage for cet