युनियन बँक ऑफ इंडियामध्ये होणाऱ्या आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँकेच्या आगामी विलीनीकरणानंतर ही देशातील ५ व्या क्रमांकाची सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक बनेल. हा करार झाल्यानंतर नव्याने तयार झालेली बँक म्हणजे ७५,००० कर्मचारी, ९६०० पेक्षा अधिक शाखा आणि १३,५०० पेक्षा जास्त एटीएम असलेले देशातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे बँकिंग नेटवर्क असेल. या विलीनीकरणामागे देशातील एक मोठी आणि कार्यक्षम बँक तयार करून बँकिंग क्षेत्राला जोखीम व्यवस्थापनाबाबत अधिक सक्षम करण्याचा उद्देश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

युनियन बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक वेंकटेश मुचल यांनी सांगितले की, अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी तसेच ग्राहकांना अधिक चांगली उत्पादने आणि सेवा प्रदान करण्यासाठी भारत सरकारने या तीन बँकांची एकत्रिकरणासाठी निवड केली आहे. या बँकांच्या विस्तृत जाळ्याद्वारे आणि विविध उत्पादने, आधुनिक तंत्रज्ञान व सेवांच्या माध्यामातून ग्राहकांना उत्कृष्ट अनुभव आणि सुधारित भांडवल क्षमताही मिळेल. कॉर्पोरेशन बँक आणि आंध्र बँकेत एकसारखी कोअर बँकिंग सिस्टीम असल्याने युनियन बँक ऑफ इंडियामधील आयटी विभागा समोरील एकत्रिकरणाचे आव्हानही सोपे झाले आहे.’

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corporation bank andhra bank merger with union bank abn