कुठलाही व्यवसाय सुरू होत असताना मोठय़ा भांडवलाची गरज असते व कोणताही व्यवसाय नफा कमाविण्यासाठी काही काळ जावा लागतो. सुरुवातीच्या दिवसांत होणारा तोटा थांबला असून या तिमाहीत कंपनीने परिचालित फायद्याची नोंद केली आहे. कंपनीच्या व्यवसायाचे स्वरूप हे स्थिर खर्चाचे असून कर्मचारी वेतन खर्चापकी प्रमुख घटक आहे. हा कंपनीच्या सेवेत मोठय़ा संख्येने असलेल्या या त्वचा विकारतज्ज्ञांचे वेतन हे तोटा होण्याचे एक प्रमुख कारण होते. एकूण खर्चाच्या तुलनेत या त्वचा विकारतज्ज्ञांचे वेतन हे एकूण खर्चाच्या ३५ टक्के आहे. चार तिमाही आधी या वेतनाचा एकूण खर्चाच्या तुलनेत वाटा ४५ टक्के होता येत्या वर्षभरात हा वाटा २५ टक्क्यांहून कमी होण्याची शक्यता वाटते. स्थिर खर्चाचे प्रमाण कमी झाल्यामुळे परिचलित नफा (Operating Profit) सध्याच्या ५ ते ६ टक्क्यांवरून १२ ते १५ टक्के होण्याची शक्यता आहे. हे नफ्याचे प्रमाण एफएमसीजी व्यवसायात आदर्श समजले जाते.
कंपनीचा महसूल उत्पादने व सेवा या दोन प्रकारांतून येतो. ‘काया स्किन क्लिनिक’साठी ४५० ते ५०० चौरस फूट व्यावसायिक जागा लागते. कंपनीने मॉल वगैरे ग्राहक सहज येण्याच्या ठिकाणी १०० ते १२५ चौरस फूट जागेत ‘काया स्किन बार’ सुरू केले आहेत. या ठिकाणी ‘काया’ची सेवा नसून फक्त उत्पादने विकली जातात. सध्या या दुकानातून होणारी विक्री १८ टक्के आहे. पुढे ही विक्री एकूण विक्रीच्या ३५ टक्के होण्याची व्यवस्थापनाला आशा आहे. सध्या प्रत्येक तिमाहीत २० ते २५ ‘काया स्किन बार’ उघडण्याचे कंपनीचे धोरण आहे. पुढील तीन वर्षांत कमी खर्चाच्या ‘काया स्किन बार’ व जास्त खर्चाच्या ‘काया स्किन क्लिनिक’ यांचा विक्रीत समान वाटा असण्याचे व्यवस्थापनाचे धोरण आहे. या धोरणामुळे तीन वर्षांत कंपनीच्या परिचलित नफ्याची पातळी १८ ते २० टक्के दरम्यान राहील, अशी आम्हाला आशा वाटते.
महत्वाचा खुलासा :
विश्लेषकांनी त्यांच्या कंपनीकडून सल्ला घेणाऱ्या ग्राहकांना या कंपनीच्या समभागांत गुंतवणुकीची शिफारस केली आहे. त्यानुसार ‘हेज फंडां’कडून ही गुंतवणूक झालीही असेल किंवा भविष्यात ते गुंतवणूक करतील. यामुळे या कंपनीच्या समभागांच्या किंमतीत वाढ होणे हे विश्लेषकाच्या स्वारस्याचे ठरू शकते, याची वाचकांनी दखल घ्यावी.
संग्रहित लेख, दिनांक 8th Sep 2014 रोजी प्रकाशित
कॉर्पोरेट ब्युटी पार्लर मॅरिको काया एंटरप्राईझेस
मॅरिको लिमिटेड ही ग्राहकोपयोगी उत्पादने तयार करणारी भारतातील एक आघाडीची कंपनी आहे. इतर ग्राहकोपयोगी वस्तूंच्या निर्मात्यांप्रमाणे मॅरिको लिमिटेड हीदेखील ताळेबंदात मोठी रोकड सुलभता असलेली कंपनी आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 08-09-2014 at 05:02 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corpotae beauty parlour marico kaya enterprises