Guru Margi 2023: ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह मार्गी किंवा वक्री होतो तेव्हा त्याचा प्रभाव सर्वच राशींवर कमी अधिक प्रमाणात होत असतो. ग्रहाच्या प्रत्येक राशीतील स्थानावरून त्याचा प्रभाव ठरत असतो. आता देवगुरू सध्या स्वराशीत म्हणजेच मेष राशीत विराजमान आहेत. २०२३ च्या अखेरीस म्हणजे उद्या रविवारी ३१ डिसेंबर २०२३ रोजी ७ वाजून ८ मिनिटांनी गुरू देव मेष राशीत मार्गी होणार आहेत. गुरु ग्रहाच्या या स्थितीचा काही राशींना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. धनलाभासह जीनवात प्रचंड यश मिळण्याची शक्यता आहे. पाहूयात कोणत्या आहेत या राशी…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘या’ राशींचं नशीब चमकणार? 

मेष राशी

देवगुरु मेष राशीमध्ये लग्न भावात मार्गी होत आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांसाठी उत्पन्नाचे अनेक स्त्रोत खुले होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. तसंच कोणत्याही जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला प्रचंड फायदा मिळू शकतो. तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. जोडीदाराच्या सल्ल्याने जे काही काम कराल त्यात तुम्हाला यश मिळू शकतो. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढण्याची शक्यता आहे.

(हे ही वाचा : बुध-शुक्र युतीमुळे घडलाय ‘लक्ष्मी नारायण योग’; ‘या’ ३ राशी होतील श्रीमंत? २०२४ मध्ये होऊ शकतात लखपती )

वृषभ राशी

देवगुरु मार्गी होत वृषभ राशीमध्ये थेट बाराव्या घरात जात आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना २०२४ मध्ये अच्छे दिन अनुभवता येऊ शकतात. तुमची प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. नोकरदार लोकांना बढती मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही या काळात जे काही काम कराल त्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. पैशाशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या नवीन वर्षात दूर होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक आनंदात वाढ होऊ शकते.

सिंह राशी

देवगुरु सिंह राशीच्या लग्न भावात मार्गी होत आहेत. त्यामुळे नोकरी-व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. नशीब तुमच्या बाजूने असण्याची शक्यता आहे. पैसा आणि आर्थिक बाबतीत सुधारणा दिसून येऊ शकते. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो. पगारदार लोकांना पदोन्नती आणि वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. घर किंवा वाहन खरेदीचे योग निर्माण होऊ शकतत. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guru margi 2023 jupiter margi in aries positive impact on these three zodiac sign bank balance to raise money pdb