Jupiter Uday 2024: वैदिक ज्योतिष गणनेनुसार, देवगुरु बृहस्पती हे संतान, जीवनसाथी, धन, संपत्ती, मार्गदर्शक, प्रशासक, शिक्षण, ज्योतिष, धर्म, उच्च पद इत्यादींचा कारक मानले गेले आहेत. गुरु हा नेहमीच लाभदायक ग्रह मानला जातो. जेव्हा एखाद्या ग्रहाची राशी बदलते तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर आणि सतत बदलणाऱ्या जगावर होतो. ज्योतिषशास्त्रानुसार, गुरुचा उदय जूनमध्ये होणार आहे. देवगुरुचा जून महिन्याच्या सुरुवातीला वृषभ राशीत उदय होणार आहे. ज्यामुळे ‘केंद्र त्रिकोण राजयोग’ निर्माण होणार आहे. यामुळे काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. चला जाणून घेऊया कोणत्या राशीसाठी गुरू ग्रहाचा उदय अक्षय फलदायी ठरेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘या’ राशींचे भाग्य उजळणार?

मेष राशी

देवगुरुच्या उदयमुळे मेष राशीच्या लोकांना हातात चांगला पैसा मिळण्याची शक्यता आहे. या राशींच्या लोकांना नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याची शक्यता अधिक आहे. चांगली बढती मिळण्याची शक्यता असल्याने मोठा धनलाभ होऊ शकतो. एकापेक्षा जास्त व्यवसायात गुंतवणूक करुन तुम्ही लाभ मिळवू शकता. अनेक स्थानिकांना परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते. वडिलोपार्जित मालमत्तेतून भरपूर लाभ मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही व्यवसायात कोणताही नवीन प्रयोग देखील करु शकता. कामं आणि योजनांमध्ये यश मिळू शकतो. या काळात तुम्ही तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल.

मिथुन राशी 

देवगुरुच्या उदयामुळे मिथुन राशीच्या लोकांना मोठा लाभ मिळू शकतो. या राशीच्या लोकांना भाग्याची साथ मिळेल आणि त्यांची सर्व कामे मार्गी लागू शकतात. अडकलेला पैसा परत मिळू शकतो. आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. नोकरदार लोकांसाठीही हा काळ खूप फायदेशीर ठरु शकतो. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. या काळात तुम्ही पैसे कमवण्यात आणि गुंतवणूक करण्यात यशस्वी व्हाल. या दरम्यान तुमचे प्रेम जीवनही खूप चांगले जाण्याची शक्यता आहे. 

धनु राशी

देवगुरुच्या उदयामुळे धनु राशीच्या लोकांचे सुखाचे दिवस सुरु होऊ शकतात. व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळू शकतात. उत्पन्नाच्या अनेक स्रोतांमधून आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्हाला चांगला नफा मिळू शकेल. भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मुलांकडून चांगली बातमी कानी पडू शकते. नवीन नोकऱ्यांसाठी ऑफर येऊ शकतात. प्रेमसंबंधात गोडवा असू शकतो. वडिलोपार्जित मालमत्तेतून आर्थिक लाभ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. समाजात तुमचा मान-सन्मान वाढू शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहू शकते.  

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guru uday jupiter rise in vrushabh these these zodiac sing can get huge money pdb