Budh Gochar 2024: ज्योतिषशास्त्रात ग्रहांचं गोचर महत्त्वपूर्ण मानलं गेलं आहे. प्रत्येक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. ग्रह त्यांच्या स्वभावानुसार गोचर फळ देत असतात. वैदिक ज्योतिषशास्त्रात बुधाला ग्रहांचा राजकुमार म्हंटलं जातं. बुध ग्रह बुद्धि, धन, व्यापार आणि संवाद यावर अधिपत्य गाजवणारा ग्रह आहे. आता बुधदेव मेष राशीत विराजमान आहेत. तर ३१ मे ला बुधदेव शुक्रदेवाच्या राशीत म्हणजे वृषभ राशीत प्रवेश करणार आहेत. बुधाचे गोचर हे तीन राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहील. जाणून घ्या या कोणत्या तीन राशी आहेत, ज्यांना बुध गोचरचा लाभ मिळणार आहे.

‘या’ राशींचे भाग्य उजळणार?

मेष राशी

बुध गोचरचा मेष राशीच्या लोकांना अनेक प्रकारे लाभ देणारे ठरु शकते. या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळून तुमचे काम पूर्ण होऊ शकते. या राशींच्या लोकांना बुधचा पाठिंबा मिळणार आहे. सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठीही हा काळ चांगला ठरु शकतो. या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. शेअर बाजाराशी संबंधित लोकांना फायदा होऊ शकतो. व्यापारी वर्गाला यावेळी चांगला लाभ मिळू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे. पैशाचा ओघ वाढल्याने तुमच्या आर्थिक समस्या संपूष्टात येऊ शकतात.

(हे ही वाचा : वाईट काळ संपणार! १ जूनपासून हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ ४ राशींचे नशीब? सूर्यदेवाच्या कृपेने होऊ शकतात लखपती )

मकर राशी

बुधदेवाच्या गोचरमुळे मेष राशीच्या लोकांना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. व्यावसायिकांना धनलाभ होऊ शकतो. अडकलेली कामं मार्गी लागू शकतात आणि अडकलेले पैसे परत मिळू शकतात. गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होऊ शकतो.  उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. तसंच, जुन्या स्रोतातूनही आर्थिक आवक सुरू राहू शकते. उत्पन्नात देखील वाढ होऊ शकते. स्पर्धा परीक्षा आणि सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्यांना शुभ बातमी मिळू शकते. या काळात प्रवासाचीही शक्यता आहे. तसेच कुटुंबात आनंदी वातावरण राहू शकते.

कुंभ राशी

या काळात उत्पन्नाचे नवीन स्रोतही निर्माण होऊ शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांना बुध ग्रहाच्या कृपेने त्यांच्या मेहनतीचं फळ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाचं कौतुक होईल आणि तुम्हाला काही मोठी जबाबदारी देखील मिळू शकते. या काळात तुमच्या व्यवसायाचा विस्तार देखील होऊ शकतो. तुम्ही घेतलेले सर्व निर्णय तुमचे भाग्य बदलून टाकू शकते. प्रेमप्रकरणात या कालावधीत यश मिळू शकते. न्यायालयीन प्रकरणातही या काळात यश मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक स्थितीही पहिल्यापेक्षा अधिक सुधारु शकते. धार्मिक कार्याची ओढ लागेल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)