Ruchak raj Yoga: ज्योतिषशास्त्रानुसार जून महिना ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीसाठी खूप उत्तम सिद्ध होणार आहे. या महिन्यात अनेक मोठ-मोठे राजयोग निर्माण होणार आहेत. ज्यात रुचक राजयोगदेखील निर्माण होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे सेनापती मंगळ ग्रहाचे विशिष्ट काळानंतर राशीपरवर्तन होते, ज्याचा प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो.

१ जून २०२४ रोजी दुपारी ३ वाजून ५१ मिनिटांनी मंगळ ग्रह मेष राशीत प्रवेश करणार आहे. मंगळाच्या या राशीपरिवर्तनाने रुचक राजयोग निर्माण होईल. हा १२ जुलै २०२४ पर्यंत राहील. ज्याचा प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार रुचक योग निर्माण झाल्यावर व्यक्तीमध्ये शारीरिक बळ, साहस, बौद्धिक क्षमता, पराक्रम निर्माण होतो.

मेष

मेष ही मंगळाची स्वराशी आहे, त्यामुळे या राशीच्या व्यक्तींवर नेहमीच मंगळाची कृपा असते. मेष राशीतील राशी परिवर्तनात मंगळ मेष राशीच्या लग्नस्थानात असेल; ज्याच्या प्रभावाने या व्यक्तींचे साहस, पराक्रम वाढेल. या काळात त्यांची आर्थिक स्थिती उत्तम राहून, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि वैवाहिक जीवन सुखमय असेल. नव्या वस्तू खरेदी कराल. अविवाहितांची लग्ने जुळतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या मेहनतीचे कौतुक होईल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना मनासारखी नोकरी मिळेल.

वृषभ

रुचक राजयोग वृषभ राशीमध्ये बाराव्या भावात निर्माण होणार आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना या काळात दूरचे प्रवास घडतील. धार्मिक कार्यात पैसा खर्च कराल. मानसिक शांती लाभेल. या काळात लोकांना अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. नव्या वस्तू खरेदी कराल. नोकरीत प्रमोशन मिळेल. मुलांकडून आनंदी वार्ता येतील. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. स्पर्धा परीक्षेत यश मिळवाल. नशीब तुमच्या बाजूने असेल. सर्व गोष्टी मनासारख्या होतील.

हेही वाचा: ३ दिवस आनंदी आनंद; ‘या’ चार राशीच्या लोकांना बुध करणार मालामाल, मिळणार धन-संपत्तीचे सुख

मिथुन

रुचक राजयोग मिथुन राशीच्या अकराव्या भावामध्ये निर्माण होईल, त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना हा योग खूप लाभकारी सिद्ध होईल. या काळात आर्थिक स्थिती मजबूत असेल. नोकरी, व्यापारात भरपूर यश मिळेल. मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम राहील. उच्च शिक्षित होण्याचे स्वप्न पूर्ण होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. अविवाहितांना लग्नाचे प्रस्वाव येतील.

(टीप – सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)