Aajche Rashi Bhavishya,16 May 2025 In Marathi : १६ मे २०२५ रोजी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी आहे. चतुर्थी तिथी शनिवारी सकाळी ५ वाजून १६ मिनिटांपर्यंत राहील. संध्याकाळी ४ वाजून ८ ८ मिनिटांपर्यंत मूल नक्षत्र जागृत असणार आहे. त्यानंतर शनिवारी सकाळी ७ वाजून ९ मिनिटांपर्यंत साध्य योग जुळून येईल. राहू काळ १०:३० वाजता सुरु होईल ते १२ वाजेपर्यंत असणार आहे. त्याचप्रमाणे आज संकष्टी चतुर्थी असणार आहे. आज बाप्पाच्या कोणच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार चला जाणून घेऊया…

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

पंचांग व राशिभविष्य,१६ मे २०२५ (Daily Horoscope in Marathi, 16 May 2025)

आजचे मेष राशिभविष्य (Daily Aries Horoscope in Marathi)

कौटुंबिक जबाबदारी वाढेल. मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल. खर्चाचा आकडा निश्चित करा. मित्रांशी मतभेद संभवतात. जमिनीच्या कामातून लाभ मिळेल.

आजचे वृषभ राशिभविष्य (Daily Taurus Horoscope in Marathi)

हौस मौज करण्यात खर्च वाढू शकतो. प्रत्येक गोष्टींचा उत्तम आस्वाद घ्याल. तुमच्या व्यक्तिमत्वाची इतरांवर चांगली छाप पडेल. सर्वांना लाघवीपणे आपलेसे कराल. आवडत्या कामात दिवस घालवाल.

आजचे मिथुन राशिभविष्य (Daily Gemini Horoscope in Marathi)

पारदर्शीपणे वागणे ठेवा. झोपेची तक्रार जाणवेल. बाह्य गोष्टींचे आकर्षण वाढू शकते. मनातील निराशा दूर सारावी. फसवणुकीपासून सावध रहा.

आजचे कर्क राशिभविष्य (Daily Cancer Horoscope in Marathi)

अधिकारी व्यक्तींचे सहकार्य मिळेल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. नवीन संबंध प्रस्थापित केले जातील. जवळचे मित्र मंडळी भेटतील. उत्तम व्यावसायिक लाभ होईल.

आजचे सिंह राशिभविष्य (Daily Leo Horoscope in Marathi)

कामानिमित्त प्रवास करावा लागेल. जोडीदाराची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करा. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. हितशत्रूंचा विरोध मावळेल. हातातील कामात यश येईल.

आजचे कन्या राशिभविष्य (Daily Virgo Horoscope in Marathi)

मानसिक गोंधळाला बळी पडू नका. कौटुंबिक गोष्टीतून मार्ग काढता येईल. मुलांचा हट्ट पुरवावा लागेल. वरिष्ठांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल. परोपकाराची जाणीव ठेवाल.

आजचे तूळ राशिभविष्य (Daily Libra Horoscope in Marathi)

सासुरवाडीची मदत मिळेल. सांपत्तिक दर्जा सुधारला जाईल. अचानक धनलाभ होईल. कामातून अनपेक्षित लाभ होईल. पत्नीची नाराजी दूर करावी.

आजचे वृश्चिक राशिभविष्य (Daily Scorpio Horoscope in Marathi)

उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. जोडीदाराबाबत आकर्षण वाढीस लागेल. कामासंबंधी नवीन योजना आखाव्यात. भागिदारीतून चांगला लाभ होईल. कौटुंबिक सुख-शांती जपावी.

आजचे धनू राशिभविष्य (Daily Sagittarius Horoscope in Marathi)

तुमच्यातील अंगीभूत कलागुणांना वाव द्यावा. आळस झटकून कामाला लागावे. ऐषारामाच्या वस्तूंकडे ओढ वाढेल. भावंडांशी मतभेद संभवतात. कामातून आनंद व समाधान

आजचे मकर राशिभविष्य (Daily Capricorn Horoscope in Marathi)

शांत व संयमी विचारांची आवश्यकता. व्यवहारी भूमिका ठेवून वागाल. सर्वांशी सर्जनशीलतेने वागण्याचा प्रयत्न कराल. छंद जोपासण्यात वेळ घालवाल. मित्र परिवारात लाडके व्हाल.

आजचे कुंभ राशिभविष्य (Daily Aquarius Horoscope in Marathi)

सर्वांना मनापासून मदत कराल. जवळचे मित्र जमवाल. दिवस गप्पा-गोष्टीत व मजेत घालवाल. कौटुंबिक जबाबदारी आनंदाने पार पाडाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल.

आजचे मीन राशिभविष्य (Daily Pisces Horoscope in Marathi)

मित्रांशी जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करा. जवळच्या नातेवाईकांची गाठ पडेल. चांगला व्यावसायिक लाभ होईल. व्यापाराच्या नवीन योजना आखल्या जातील. निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्याल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sankashti chaturthi on 16 may 2025 aries to pisces rashi bhavishya in marathi vnk 50 asp