Rahu In Shani Nakshatra Gochar 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रात मायावी ग्रह राहू व न्याय देवता शनी महाराज यांचे विशेष महत्त्व आहे. शनी व राहू यांच्यातील नाते मित्रत्वाचे आहे. आता लवकरच शनी व राहू यांच्या एकत्र प्रभावाची एक स्थिती जुळून येणार आहे. ८ जुलैला राहू नक्षत्र परिवर्तन करून शनीच्या स्वामित्वाच्या नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. उत्तरा भाद्रपद नक्षत्रावर शनीचे स्वामित्व आहे. राहूचा आपल्या मित्राच्या नक्षत्रातील प्रवेश शुभ योगाची निर्मिती करणार आहे. ज्योतिष अभयस्कांच्या माहितीनुसार राहूचे नक्षत्र गोचर पाच राशींसाठी भाग्याची गुरुकिल्ली असणार आहे. या पाच राशींना आयुष्यात एकूणच सकारात्मक प्रभाव जाणवून येईल. धन, राजकारण, प्रॉपर्टीच्या बाबत काही गोष्टींना वेगळी वळणे लाभू शकतात तसेच करिअरमध्ये सुद्धा गती येऊ शकते. या पाच नशीबवान राशी कोणत्या हे पाहूया..

राहूच्या शनी नक्षत्रातील प्रवेशाने ‘या’ पाच राशींच्या नशिबाला मिळेल कलाटणी

मेष रास (Aries Rashi Bhavishya)

मेष राशीच्या मंडळींसाठी राहूचे नक्षत्र परिवर्तन एखादा मोठा विजय ठरू शकते. आपल्याला या कालावधीत शत्रूंवर मात करता येऊ शकते. कामाच्या ठिकाणी नवीन प्रयोगच कामी येऊ शकतात. तुमची प्रतिष्ठा जपून ठेवण्यासाठी व्यक्तिमत्वात काही महत्त्वाचे बदल करावे लागतील व त्याचे परिणाम अत्यंत फायदेशीर असतील. नोकरदार मंडळींना पगारवाढीसह पदोन्नतीच्या संधी मिळू शकतात. प्रॉपर्टी व वाहनाच्या खरेदीचे योग आहेत. नेतृत्वाचे कौशल्य बाळगल्यास तुम्हाला धनलाभाचा मोठा वाटा मिळू शकतो. राजकारणात सक्रिय असणाऱ्यांना पद, प्रतिष्ठा लाभू शकते.

मिथुन रास (Gemini Rashi Bhavishya)

राहूचे नक्षत्र परिवर्तन मंडळींना जुन्या समस्यांमधून सुटका मिळवून देऊ शकते. आर्थिक मिळकतीत वाढ होऊ शकते. अडकून पडलेले पैसे परत मिळू शकतात. आपल्याला कामाच्या ठिकाणी काहीसा आराम करता येऊ शकतो. नोकरीच्या ठिकाणी मोठे पद मिळवता येईल. वैवाहिक आयुष्यात सुख व समाधान लाभेल.

सिंह रास (Leo Rashi Bhavishya)

राहूचे नक्षत्र गोचर सिंह राशीच्या व्यापारी वर्गासाठी लाभदायक असू शकते. व्यवसायात वाढ होऊ शकते ज्या माध्यमातून धनप्राप्तीचे योग आहेत. वाणीच्या बळावर तुम्हाला तुमची छाप पाडता येईल. नोकरदार वर्गाला नोकरीत बदलाचे संकेत आहेत. नव्या संधींसह वाढीव आर्थिक मिळकतीची चिन्हे तुमच्या नशिबात आहेत. ध्यानधारणेकडे लक्ष द्या. येणारा कालावधी तुमच्यासाठी थोडा धावपळीचा असणार आहे त्यामुळे मानसिक स्थिरता राखण्यासाठी मेहनत करा. सिंह राशीला आत्मविश्वास लाभाड्याक ठरू शकतो.

तूळ रास (Libra Rashi Bhavishya)

राहुचे नक्षत्र परिवर्तन तूळ राशीच्या कुंडलीत सुवर्ण काळ सुरु करू शकते. आपल्याला एका पाठोपाठ एका लाभदायक संधी मिळू शकतात. काही आनंदाचे क्षण तुमच्या वाट्याला येऊ शकतात, तुमचे कुटुंब व मित्र या आनंदाचे माध्यम ठरतील. बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळू शकतात. आपली लोकप्रियता वाढेल आणि परिणाम मान- सन्मान सुद्धा वाढू शकतो. महत्त्वाकांक्षी व्यक्तींना इच्छा पूर्ण करण्यासाठी योग्य माध्यम लाभेल.

हे ही वाचा<< संकष्टी चतुर्थी, २५ जून पंचांग: २०२४ च्या एकमेव अंगारकीला मोदक पेढे वाटण्याचा योग आज मेष ते मीनपैकी कोणत्या राशीत?

मकर रास (Capricorn Rashi Bhavishya)

मकर राशीचे स्वामी शनी महाराज आहेत. शनी कुंभ राशीत असल्याने मकर राशीत सुद्धा प्रभावी आहेत. आता शनीच्या नक्षत्रात राहू आल्याने मकर राशीच्या नशिबाला कलाटणी मिळू शकते. करिअरशी संबंधित साहसी निर्णय घेण्यासाठी हा काळ फायद्याचा आहे. भविष्यात याचा फायदा होऊ शकतो. गुंतवणुकीसाठी शुभ कालावधी आहे. वरिष्ठांशी नीट जुळवून घेता येईल. कुटुंबासह वेळ घालवू शकाल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहिती व गृहीतके यांच्यावर आधारित आहे)