Shani Transit 2024: ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या राशी परिवर्तनासोबत त्यांचे नक्षत्र परिवर्तनदेखील होते. शनी ग्रहाला न्याय आणि कर्माची देवता म्हणून ओळखले जाते. शनी एका राशीत जवळपास अडीच वर्षे उपस्थित असतो. शनीला संपूर्ण राशिचक्र पूर्ण करण्यासाठी ३० वर्षांचा काळ लागतो. सध्या शनी त्याची स्वराशी असलेल्या कुंभ राशीत विराजमान असून, राशी परिवर्तनासह शनीचे नक्षत्र परिवर्तनदेखील खूप खास मानले जाते. सध्या शनी पूर्वा भाद्रपद नक्षत्रामध्ये उपस्थित असून, तो ३ ऑक्टोबर रोजी नक्षत्र परिवर्तन करून शनी राहूच्या शतभिषा नक्षत्रात प्रवेश करील. त्यामुळे हा काळ काही राशींच्या व्यक्तींना खूप लाभ देणारा ठरेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंचांगानुसार शनी ३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी शतभिषा नक्षत्रामध्ये प्रवेश करील आणि या नक्षत्रामध्ये शनी २७ डिसेंबरपर्यंत राहील. त्यानंतर शनी पुन्हा पूर्वा भाद्रपद नक्षत्रामध्ये प्रवेश करील. २७ नक्षत्रांमध्ये शतभिषा हे २४ वे नक्षत्र आहे आणि या नक्षत्राचा स्वामी ग्रह राहू आहे.

शनीच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशी होणार मालामाल (Shani Transit 2024)

मेष (Aries Rashi Bhavishya)

शनी शतभिषा नक्षत्रामध्ये प्रवेश करून, या राशीच्या अकराव्या घरात येईल. या घराला इच्छा आणि आकांक्षांचे घर म्हटले जाते. त्यामुळे या काळात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. हा काळ मेष राशीच्या व्यक्तींसाठी खूप शुभ परिणाम देणारे असेल. या काळात तुमच्या आयुष्यातील अनेक संकटांवर तुम्ही सहज मात कराल, धन-संपत्तीचे सुख मिळेल. तसेच उत्पन्नाचे नवे स्रोत सापडतील. समाजात मान-सम्मान वाढेल. अडकलेले पैसे परत मिळतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. शनी तुम्हाला या काळात प्रत्येक अडचणीत मदत करील. या काळात तुमच्या मनात अध्यात्माची ओढ असेल. आरोग्य उत्तम राहील.

वृषभ (Tauras Rashi Bhavishya)

शनी शतभिषा नक्षत्रामध्ये प्रवेश करून या राशीच्या दहाव्या घरात येईल. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठीही शनीचे हे नक्षत्र परिवर्तन खूप फायदेशीर ठरेल. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचे आरोग्य उत्तम राहील. विदेशी जाण्याचे योग आहेत. नोकरदार व्यक्तींना पदोन्नती मिळेल. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण असेल. सर्वांसोबत चांगले संबंध निर्माण होतील आणि जुने वाद मिटतील. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल.

हेही वाचा: १५ नोव्हेंबरपर्यंत पैसाच पैसा! शनि निर्माण करणार ‘शश राजयोग’, ‘या’ तीन राशींचे लोक कमावणार भरपूर पैसा

धनू (Sagittarius Rashi Bhavishya)

शनी शतभिषा नक्षत्रामध्ये प्रवेश करून या राशीच्या तिसऱ्या घरात येईल. शनीचा शतभिषा नक्षत्रातील प्रवेश खूप लाभकारी सिद्ध होईल. या काळात भौतिक सुखाची प्राप्ती होईल. नव्या नोकरीची ऑफर मिळेल. मान-सन्मानात वाढ होईल. न्यायालयीन प्रकरणात यश मिळेल. नव्या कामाची सुरुवात होईल. कामातील अडथळे दूर होतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani will enter rahus nakshatra after 82 days three zodiac signs will get a lot of success in job and business sap