Astrology Tips : नवीन व्यवसायची सुरुवात करत आहात? ‘या’ उपायांचा वापर केल्याने होईल भरभराट

आपण ज्योतिष शास्त्राशी संबंधित अशा काही उपायांबद्दल जाणून घेऊया, ज्यामुळे तुम्हाला व्यवसायात फायदा होऊ शकतो.

Rashi
व्यापाऱ्यांचा फक्त एकच उद्देश असतो की त्यांच्या व्यवसायाने यशाचे शिखर गाठावे.

Astrology Tips : आजकाल प्रत्येकालाच व्यवसाय करायचा असतो. मग ते लहानसे दुकान असो किंवा मोठे शोरूम, व्यवसायात यश मिळावे म्हणून लोक काय काय करतात. दुकानात लिंबू-मिरची लावण्यापासून धूप लावण्यापर्यंत सर्व उपाय आजमावले जातात. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींच्या मनात आपला व्ययसाय चालेल की नाही अशी शंका दररोज येत असते. व्यापाऱ्यांचा फक्त एकच उद्देश असतो की त्यांच्या व्यवसायाने यशाचे शिखर गाठावे. आज आपण ज्योतिष शास्त्राशी संबंधित अशा काही उपायांबद्दल जाणून घेऊया, ज्यामुळे तुम्हाला व्यवसायात फायदा होऊ शकतो.

हे उपाय केल्याने व्यवसायात होईल लाभ

प्रत्येक मंगळवारी पिंपळाची ११ पाने घ्यावी आणि लाल चंदनाने प्रत्येक पानावर राम लिहावे. यानंतर ही पानं हनुमानाच्या मंदिरात अर्पण करावी. हा उपाय केल्याने तुम्ही तुमच्या व्यवसायात अपयशी होणार नाही. परंतु हा उपाय करताना याबद्दल इतर कोणालाही सांगू नये.

आर्थिक चणचणीमुळे हैराण आहात? राशीनुसार जवळ बाळगा ‘या’ वस्तू; लवकरच होईल धनलाभ

सोमवारी ११ बेलाची पाने घेऊन त्यावर केसरने ‘ॐ नमः शिवाय’ असे लिहून शंकराच्या पिंडीवर अर्पण करावे. तसेच या मंत्राचा जप केल्यानेही तुमच्या सर्व व्यावसायिक समस्या दूर होतील. १६ सोमवार हा उपाय करावा.

व्यवसायासाठी सामान खरेदी करायला जाण्यापूर्वी २१ रुपये कोणत्याही गुप्त ठिकाणी ठेवावे. परत आल्यानंतर हे २१ रुपये कोणाला तरी दान करावे किंवा त्यांना जेवण द्यावे. हा उपाय केल्याने व्यापारात लाभ मिळेल.

कापूर आणि कुंकू मिसळून जाळावे आणि त्याची राख कागदाच्या पुडीत बांधावी. ही पुडी आपल्या गल्ल्यात ठेवावी. असे केल्याने तुमच्या व्यवसायात दोष असेल तर तो नष्ट होतो, असे मानले जाते.

तुम्ही दुकानात स्वच्छता करत असाल, पूजा करत असाल तरीही तुमच्या दुकानात येणाऱ्या ग्राहकाला कधीही रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका. पहिल्या ग्राहकाने कमी नफा दिला तरी चालेल पण त्याला रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका.

जर तुमचे ग्राहक तुटत असतील तर झेंडूचे फूल बारीक करून त्याचा टिका कपाळावर लावा आणि मग त्या व्यक्तीशी बोला. हा उपाय केल्याने तुमचे ग्राहक तुटणार नाहीत.

रोज रात्री एका विशिष्ट वेळी जाग येणं सामान्य नाही; यामागे दडलेले आहे ‘हे’ विशेष रहस्य

थोडे कच्चे सूत शुद्ध कुंकूमध्ये रंगवा आणि ते रंगवलेले कच्चे सूत तुमच्या कार्यालयात किंवा जेथे तुमची प्रतिष्ठान आहे तेथे बांधा. असे केल्याने व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे.

गुरुवारी तुळशीभोवती उगवलेले तण एका पिवळ्या कपड्यात बांधून व्यवसायाच्या ठिकाणी ठेवावे. हा उपाय फक्त गुरुवारीच करावा. असे केल्याने तुमच्या व्यवसायात भरभराट होईल.

(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Starting a new business using these remedies will bring prosperity pvp

Next Story
आजचं राशीभविष्य, शनिवार, २९ जानेवारी २०२२
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी