scorecardresearch

रोज रात्री एका विशिष्ट वेळी जाग येणं सामान्य नाही; यामागे दडलेले आहे ‘हे’ विशेष रहस्य

धर्मशास्त्रांमध्ये रात्री पुन्हा पुन्हा जाग येणे किंवा एखादया विशिष्ट वेळीच जाग येणे यामागील रहस्य सांगितले आहे. हे आपल्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी दर्शवते.

uncommon signs pexels
रात्री वेगवेगळ्या वेळी जाग येण्यासंबंधी अर्थ किंवा संकेत भिन्न-भिन्न आहेत. (Photo : Pexels)

झोप न येणे किंवा रात्री सतत जाग येणे यामागे तणावासोबतच अनेक प्रकारच्या मानसिक-शारीरिक गोष्टी कारणीभूत ठरू शकतात. परंतु यामागे अजूनही एक कारण असू शकते, ज्याकडे बहुतांश लोक दुर्लक्ष करतात. असे देखील म्हणता येईल की ते या कारणापासून अनभिज्ञच राहिले आहेत. धर्मशास्त्रांमध्ये रात्री पुन्हा पुन्हा जाग येणे किंवा एखादया विशिष्ट वेळीच जाग येणे यामागील रहस्य सांगितले आहे. हे आपल्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी दर्शवते.

रात्री वेगवेगळ्या वेळी जाग येण्यासंबंधी अर्थ किंवा संकेत भिन्न-भिन्न आहेत. हा त्रास टाळण्यासाठी काही उपायही सुचवण्यात आले आहेत.

रात्री ९ ते ११च्या दरम्यान जाग येणे : जर रोज रात्री तुम्हाला ९ ते ११च्या दरम्यान जाग येत असेल तर याचा अर्थ तुमच्या मनात काही ना काही काळजी असते. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा थंड पाण्याने धुवावा तसेच झोपण्याआधी मंत्राचा जप करून झोपावे.

लग्नामध्ये विलंब होत असल्यास नक्की करा ‘हे’ उपाय; लवकरच मिळेल खुशखबर

रात्री ११ ते १च्या दरम्यान जाग येणे : जर तुम्हाला रोज रात्री ११ ते १ वाजेच्या दरम्यान जाग येत असेल तर हे तुमच्या मनाच्या विचलिततेचे लक्षण आहे. यासाठी झोपण्यापूर्वी नकारात्मक विचार करणे टाळावे. सकारात्मकेसाठी काही चांगले वाचावे किंवा ऐकावे.

रात्री १२ ते २च्या दरम्यान जाग येणे : रोज रात्री १२ ते २ च्या दरम्यान तुम्हाला जाग येणे हे काही अज्ञात शक्ती तुमच्या अवतीभवती असण्याचे लक्षण आहे. ही शक्ती तुम्हाला तुमच्या जीवनाच्या उद्दिष्टांची जाणीव करून देते. त्यामुळे या उद्दिष्टांप्रती जागरूक राहणे आणि आपल्या जीवनाबद्दल गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे.

रात्री १ ते २ च्या दरम्यान जाग येणे : हे तुमच्या अति रागाचे लक्षण आहे. त्यामुळे आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे आणि या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी झोपण्यापूर्वी हात-पाय धुवा आणि थंड पाणी प्या.

रात्री ३ वाजण्याच्या आसपास जाग येणे : हे एक लक्षण आहे, ब्रह्मांड आणि दैवी शक्तीची इच्छा आहे की तुम्ही उठून तुमच्या प्रमुख देवतेची पूजा करावी. त्यामुळे भगवंताचा जप करा कारण अनेक शक्ती तुमची वाट पाहत आहेत, ज्या तुम्हाला येणाऱ्या काळात मिळणार आहेत.

रात्री ३ ते पहाटे ५च्या दरम्यान जाग येणे : याचा अर्थ असा आहे की काही अज्ञात शक्ती तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी जाग आल्यास भगवंताचे नामस्मरण करावे.

रस्त्यावर पैसे सापडल्यास आवर्जून करा ‘ही’ गोष्ट; बदलेल तुमचे नशीब

सकाळी ५ ते ७च्या दरम्यान जाग येणे : अशा वेळी जाग येणे हे भावनिकदृष्ट्या कमकुवत होण्याचे लक्षण आहे. यासाठी मेडिटेशन करणे चांगले ठरेल.

(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: It is uncommon to wake up at a specific time each night there is a special secret behind it pvp

ताज्या बातम्या